
पुणे | Pune
भारत (India) आणि श्रीलंका (Sri Lanka) संघांमध्ये ३ सामन्यांची टी २० मालिका (T20 Series) सुरु आहे. मालिकेतील दुसरा टी २० सामना आज गुरुवारी पुण्याच्या गहुंजे क्रिकेट स्टेडियमवर सायंकाळी ७ वाजता खेळवण्यात येणार आहे....
भारतीय संघाने या मालिकेत १-० ने विजयी आघाडी घेतली आहे. उद्याचा सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा असणार आहे. मुंबई येथील पहिला वानखेडे स्टेडियमवर झालेला २ धावांनी थरारक विजय संपादन करून भारतीय संघाने हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मालिका विजय संपादन करण्यासाठी आपण पूर्णपणे सज्ज असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
भारतीय संघ आपला विजयी सिलसिला असाच कायम ठेवण्यासाठी उद्या पुण्याच्या मैदानात उतरणार आहे. तर मालिका पराभवाचं सावट असलेला श्रीलंका मालिकेत १-१ ने बरोबरी साधण्यासाठी उत्सुक आहे. भारतीय संघाचा कर्णधार हार्दिक पांड्या भारतात कर्णधार म्हणून पहिली टी २० मालिका जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे.
तब्ब्ल २२ महिन्यांच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर या मैदानावर टी २० सामन्याचे आयोजन करण्यात येणार आहे. पुण्याच्या मैदानावर हा चौथा सामना असणार आहे. एकूण १३ वा आंतरराष्ट्रीय सामना असणार आहे.
भारत आणि श्रीलंका संघांमध्ये सध्या ३ सामन्यांच्या टी २० मालिकेचा थरार सुरु आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना आज पुण्याच्या गहुंजे क्रिकेट मैदानावर होणार आहे. मात्र सामना सुरु होण्यासाठी काही तास शिल्लक असताना भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे.
भारतीय संघाचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनला भारत आणि श्रीलंका यांच्यातील वानखेडे स्टेडियम मुंबई येथे झालेल्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाचं क्षेत्रक्षण सुरु असताना मैदानावर अचानक दव पडल्यामुळे संजूचा पाय अचानक घसरला त्याचा गुडघ्याला दुखापत झाल्यामुळे संपूर्ण मालिकेतून तो बाहेर झाला आहे.
संजू सॅमसनचा पर्यायी यष्टीरक्षक म्हणून युवा यष्टीरक्षक जितेश शर्माला भारतीय संघात संधी देण्यात आली आहे. जितेश शर्मा आयपीएलमध्ये पंजाबकिंग्ज संघाकडून खेळतो. आयपीएल स्पर्धेत चमकदार कामगिरीमुळे त्याची भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. पंजाबकिंग्ज संघाचे प्रतिनिधित्व करताना जितेशने फिनिशरची भूमिका चोख बजावली आहे.
सलिल परांजपे, नाशिक.