महिला आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा

महिला आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा

मुंबई | Mumbai

बांगलादेश येथे १ ते १३ ऑक्टोबरदरम्यान महिलांच्या आशिया चषक स्पर्धेचे (Women's Asia Cup) आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघाची (Team India) नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. आशिया क्रिकेट परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघाचे नेतृत्व हरमनप्रीत कौरकडे (Harmanpreet Kaur) असणार आहे...

तर स्मृती मंधाना उपकर्णधार असणार आहे. इंग्लंड (England) येथे टी २० मालिकेत सहभागी झालेला भारतीय संघ आशिया चषकासाठी कायम ठेवण्यात आला आहे. स्पर्धेचा अंतिम सामना १३ ऑक्टोबरला होणार आहे. ७ ऑक्टोबरला भारतीय महिला संघाला पारंपरिक कट्टर प्रतिस्स्पर्धी पाकिस्तान (Pakistan) संघाचा सामना करावा लागणार आहे.

तानिया भाटिया आणि सिमरन बहादूर यांना राखीव खेळाडू म्हणून भारतीय संघात संधी देण्यात आली आहे. इंग्लडविरुद्ध टी २० मालिकेत दोन्ही खेळाडूंना अंतिम ११ मध्ये संधी देण्यात आली नव्हती. हरमनप्रीत कौरचा भारतीय संघाला सातवा आशिया चषक पटकावण्याची संधी असणार आहे. भारतीय महिला संघाचा सलामी सामना श्रीलंकेशी होणार आहे.

भारतीय संघ

स्मुर्ती मंधाना, हरमनप्रीत कौर, शेफाली वर्मा, दीप्ती शर्मा, जेमिमा रॉड्रिक्स, सब्बीनेनी मेघना, रिचा घोष, स्नेह राणा, दयालन हेमलता, मेघनसिंग, रेणुका ठाकूर, पूजा वस्त्रकर, राजेश्वरी गायकवाड, राधा यादव, आणि केपी नवगिरे. तानिया भाटिया आणि सिमरन दिल बहादूर राखीव खेळाडू.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com