भारत - दक्षिण आफ्रिका T 20 मालिका उद्यापासून

भारत - दक्षिण आफ्रिका T 20 मालिका   उद्यापासून

मुंबई । Mumbai

भारतीय संघ (indian team) उद्यापासून (दि.९ जून) मायभूमीवर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (South Africa) ५ सामन्यांच्या टी २० मालिकेला लोकेश राहुलच्या (Lokesh Rahul) नेतृत्वात नव्याने सुरुवात करणार आहे...

भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील ५ सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना नवी दिल्लीच्या अरुण जेटली क्रिकेट मैदानावर (Arun Jaitley cricket Ground) सायंकाळी ६:५० वाजता खेळवण्यात येणार आहे.

दोन्ही संघांकडे अनेक मातब्बर खेळाडू असल्यामुळे मालिकेचा विजयी शुभारंभ करण्यासाठी भारत आणि दक्षिण आफ्रिका (india vs SA) संघ सज्ज झाले आहेत. आयपीएलपूर्वी (IPL) भारतीय संघाने सलग १२ सामन्यांमध्ये विजय मिळवून दणक्यात सुरुवात केली होती. आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या सामन्यात विजय मिळवून सलग १३ सामन्यांमध्ये विजय मिळवणारा पहिला संघ बनण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे.

भारतीय संघासाठी विशेष बाब म्हणजे सलामीवीर डावखुरा यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशन (Ishaan Kishan) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिलाच टी २० आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे. त्यामुळे त्याच्याकडून मोठी खेळी भारतीय संघाला अपेक्षित आहे.

त्याचप्रमाणे भारतीय संघात अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या (Hardik Pandya) आणि फिनिशर दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) यांनी बऱ्याच कालावधीनंतर पुनरागमन केले आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकेत आपल्या कामगिरीचा ठसा उमटवून आगामी ऑस्ट्रेलियामध्ये टी २० वर्ल्डकपसाठी निवडण्यात येणाऱ्या चमूत आपली जागा भक्कम करण्यासाठी दोन्ही खेळाडू चांगलेच प्रयत्नशील आहेत.

दरम्यान ,आयपीएल २०२२ मध्ये दमदार प्रदर्शनाच्या बळावर भारतीय संघात नव्याने दाखल झालेले आर्षदिपसिंग आणि उमरान मलिक यांच्यावर भारतीय समर्थकांचे आणि भारतीय संघनिवड समितीचे आवर्जून लक्ष असेल. तसेच पहिल्या टी २० सामन्यात लोकेश राहुल , ईशान किशन , श्रेयस अय्यर, टेम्बा बाऊमा कागिसो रबाडा हे स्टार प्लेयर्स असतील.

सलिल परांजपे, नाशिक

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com