
मुंबई | Mumbai
भारतीय क्रिकेट संघाने (Indian Cricket Team) इंग्लडविरुद्ध (England) झालेल्या रविवारच्या तिसऱ्या आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्यात इंग्लडचा ५ विकेट्सने पराभव केला. आणि रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वात ऐतिहासिक विजयाची नोंद केली. मँचेस्टर येथे १९८३ नंतर प्रथमच भारतीय संघाने प्रथमच विजय साकारला...
यष्टीरक्षक युवा फलंदाज रिषभ पंतने (Rishabh Pant) झळकावलेले शानदार शतक आणि हार्दिक पंड्याच्या (Hardik Pandhya) अष्टपैलू कामगिरीच्या बळावर भारताने ३ सामन्यांची मालिका २-१ अशी जिंकली. आठ वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर भारतीय संघाने एकदिवसीय मालिकेवर आपले नाव कोरले आहे.
रोहित शर्मा, मोहंमद अझरुद्दीन, एम. एस. धोनीनंतर इंग्लडला इंग्लडमध्ये एकदिवसीय मालिकेत पराभवाची धूळ चारणारा तिसरा कर्णधार ठरला आहे. या विजयासह भारतीय संघाने आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत (ICC ODI Rankings) सातव्या स्थानावरून तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे.
तर पाकिस्तान (Pakistan) संघाची चौथ्या स्थानी घसरण झाली आहे. न्यूझीलंड संघाच्या खात्यात १२८ गुण असून तो पहिल्या स्थानावर आहे. इंग्लंडच्या खात्यात १२१ गुण असल्याने इंग्लंड दुसऱ्या स्थानी आहे. तिसऱ्या स्थानावर १०९ गुणांसह भारत आहे तर पाकिस्तान १०६ गुणांनी चौथ्या स्थानावर आहे.
रोहित शर्माने एकदिवसीय आणि टी २० मालिका जिंकली आहे. भारतीय क्रिकेट संघाला विंडीज आणि झिम्बाब्वे विरुद्ध ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळायची आहे.
सलिल परांजपे, नाशिक.