भारत-न्यूझीलंड निर्णायक टी २० सामना आज

भारत-न्यूझीलंड निर्णायक टी २० सामना आज

अहमदाबाद | Ahmedabad

 भारत आणि न्यूझीलंड (New Zealand) संघांमधील ३ सामन्यांच्या टी २० मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना बुधवारी (१ फेब्रुवारी) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर(Narendra Modi Cricket Stadium) होणार आहे. सामन्याचे थेट प्रक्षेपण सायंकाळी ७ वाजता स्टार स्पोर्ट्स आणि हॉटस्टार वाहिनीवर(Hotstar channel) करण्यात येणार आहे. एकदिवसीय मालिकेतील ३-० ने लाजिरवाणा पराभव स्वीकारल्यानंतर पाहुण्या न्यूझीलंड संघाने रांची येथील सलामी सामन्यात विजय संपादन करून मालिकेची दणक्यात सुरुवात केली होती.

त्यामुळे लखनऊ (Lucknow) येथील सामन्यात विजय संपादन करून मालिका खिशात टाकण्याची न्यूझीलंड संघाला संधी होती. मात्र यजमान भारतीय संघाने दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंड संघावर विजय संपादन करून मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. त्यामुळे मालिकेत आता वेगळीच रंगत निर्माण झाली आहे.

त्यामुळे अखेरच्या सामन्यात आपला विजय कायम राखण्याचा यजमान भारतीय संघाचा (Indian team) इरादा असणार आहे. तर एकदिवसीय मालिकेतील पराभव विसरून अहमदाबाद (Ahmedabad) येथील सामन्यात विजय संपादन करून दौऱ्याचा शेवट गोड करण्यासाठी न्यूझीलंड मैदानात उरणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com