टीम इंडियाला आशिया चषकापूर्वी मोठा धक्का!

टीम इंडियाला आशिया चषकापूर्वी मोठा धक्का!

मुंबई | Mumbai

आशिया चषकापूर्वी (Asia Cup 2022) टीम इंडियाला (Team India) मोठा झटका लागला आहे. मुख्य प्रशिक्षपदी असणाऱ्या राहुल द्रविडला (Rahul Dravid) करोनाची (Covid-19​​) लागण झाली आहे. आशिया चषकासाठी राहुल द्रविड जाऊ शकणार की नाही यावरही आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

आशिया चषकासाठी टीम इंडिया आज यूएईला (UAE) रवाना होणार आहे. मात्र, राहुल द्रविड टीम इंडियासोबत यूएईला रवाना होणार नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. व्हीव्हीएस लक्ष्मण झिम्बाब्वेहून यूएईला आलेल्या खेळाडूंसह आशिया कपसाठी टीम इंडियामध्ये सामील होऊ शकतो.

आशिया चषकाला येत्या २७ ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. तर, अंतिम सामना ११ सप्टेंबर रोजी खेळला जाणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना श्रीलंका आणि बांग्लादेश यांच्यात खेळला जाणार आहे. तर या स्पर्धेत टीम इंडिया पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी २८ ऑगस्ट रोजी खेळला जाणार आहे.

दरम्यान, सुपर ४ साठी ६ सामने खेळवले जाणार आहेत. सुपर फोरचा पहिला सामना ३ सप्टेंबरला शारजहामध्ये होणार आहे. तर त्याचा शेवटचा सामना ९ सप्टेंबरला म्हणजे फायनलच्या दोन दिवस आधी होणार आहे. हा सामना दुबईत होणार आहे. सुपर फोरमधील पहिला सामना वगळता बाकीचे सर्व सामने दुबईत होणार आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com