भारताचा एकही खेळाडू ICC च्या T-20 संघात नाही

भारताचा एकही खेळाडू ICC च्या T-20 संघात नाही

दुबई | Dubai

२०२१ मधील सर्वोत्तम ट्वेन्टी-२० संघांच्या निवडीची घोषणा आयसीसीकडून (ICC) करण्यात आली आहे. यात भारताच्या (India) एकाही क्रिकेटपटूला स्थान देण्यात आले नाही. पाकिस्तानच्या (Pakistan) बाबर आझमला (Babar Azam) या ट्वेन्टी-२० संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे...

बाबर आझमच्या नेतृत्वात पाकिस्तानने ट्वेन्टी-२० विश्‍वकरंडकाच्या उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. शिवाय त्याने २०२१ मधील २९ सामन्यांमध्ये ३७.५६ च्या सरासरीने ९३९ धावा केल्या होत्या. यामध्ये एक शतक व नऊ अर्धशतकांचा समावेश होता.

विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वात भारतीय क्रिकेट संघाला (Indian Cricket Team) ट्वेन्टी-२० विश्‍वकरंडकात साखळी फेरीतच पराभवाचा सामना करावा लागला होता. या निराशाजनक कामगिरीचा फटका भारतीय क्रिकेटपटूंना बसला आहे.

आयसीसीकडून निवडण्यात आलेल्या या संघात पाकिस्तानच्या तीन खेळाडूंचा समावेश आहे. यात बाबर, महम्मद रिझवान व शाहीन आफ्रिदीचा समावेश आहे. तसेच मिचेल मार्श व जोश हेझलवूड या दोन ऑस्ट्रेलियन खेळाडूंनादेखील स्थान देण्यात आले आहे.

असा आहे ट्वेन्टी-२० संघ

जोस बटलर, महम्मद रिझवान, बाबर आझम, एडन मार्करम, मिचेल मार्श, डेव्हीड मिलर, तबरेझ शम्सी, जोश हेझलवूड, वनींदू हसारंगा, मुस्तफिजुर रहमान, शाहीन आफ्रिदी.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com