भारताने बांगला टायगर्सला लोळवलं

भारताने बांगला टायगर्सला लोळवलं

अ‍ॅडलेड |

टी२० विश्वचषकात ग्रुप बी मध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यात ॲडलेडमध्ये सामना खेळला गेला. आजचा सामन्यात भारताने बांगलादेशवर पाच धावांनी विजय मिळवला आहे...

बांगलादेशचा कर्णधार शकिब अल हसन याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाने २० षटकांत ६ बाद १८४ धावा केल्या. बांगलादेशला सामना जिंकण्यासाठी १८५ धावा करायच्या होत्या. मात्र पावसाने खोडा घातला.

या सामन्यात पावसाचा व्यत्यय आला. त्यावेळी लिटन दासच्या अर्धशतकाच्या जोरावर बांगलादेशनं बिनबाद 66 धावा केल्या होत्या. त्यामुळे पाऊस थांबल्यानंतर बांगलादेशला 16 ओव्हरमध्ये 151 असं सुधारित टार्गेट मिळालं. अखेर अटीतटीच्या सामन्यात भारताने बांगला टायगर्सवर पाच धावांनी विजय मिळवला.

भारतीय संघाचा यंदाच्या वर्ल्ड कपच्या मैदानातला हा तिसरा विजय ठरला. त्यामुळे टीम इंडिया पॉईंट टेबलमध्ये 6 पॉईंटसह पहिल्या नंबरवर पोहोचली आहे. आता भारतीय संघाचा सेमी फायनलमधला प्रवेश निश्चित मानला जात आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com