
चितगांव | chittagong
भारत आणि बांगलादेश (Ind vs Ban) संघांमधील ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेचा थरार आटोपला असून, बांगलादेश संघाने एकदिवसीय मालिका २-१ अशी जिंकली आहे. आता बुधवारपासून दोन्ही संघांमधील २ सामन्यांच्या कसोटी मालिकेला बुधवारपासून सुरुवात होणार आहे...
एकदिवसीय मालिकेतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. तर एकदिवसीय मालिकेपाठोपाठ कसोटी मालिकेवर आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी बांगलादेश सज्ज असणार आहे.
मात्र कसोटी मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी भारतीय संघाला ३ मोठे धक्के बसले आहेत. नियमित कर्णधार रोहित शर्मा, अष्टपैलू रविंद्र जडेजा आणि जलदगती गोलंदाज मोहंमद शमी यांना या मालिकेतून माघार घ्यावी लागली आहे. बांगलादेश संघाचे कर्णधारपद शाकिब अल हसनकडे असणार आहे. भारतीय संघाचं कर्णधारपद लोकेश राहुलकडे असणार आहे.
आयसीसीतर्फ पुढील वर्षी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी भारतीय संघाला ६ कसोटी सामने खेळायचे आहेत. यामध्ये २ कसोटी सामने बांगलादेशविरुद्ध आणि भारतात ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४ कसोटी सामने खेळायचे आहेत. मात्र भारतीय संघाला आपले उर्वरीत ६ सामन्यात विजय संपादन करावा लागणार आहे.
बांगलादेश संघाचं आव्हान आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतून यापूर्वीच संपुष्टात आलं आहे. आता भारतीय संघाला पराभूत करून भारताचं आव्हान संपुष्टात अंणण्यासाठी बांगलादेश मैदानात उतरणार आहे. सामना भारतीय वेळेनुसार सकाळी ९:३० वाजता खेळवण्यात येणार आहे. सामन्याचे थेट प्रक्षेपण सोनी सीक्स वाहिनीवर करण्यात येणार आहे.
भारतीय संघात रोहित शर्मा, रविंद्र जडेजा आणि मोहंमद शमीच्या बदली खेळाडू म्हणून सौरभ कुमार, नवदीप सैनी आणि अभिमन्यू ईश्वरन याचा समावेश करण्यात आला आहे. तसेच जयदेव उनाडकटचं संघात १२ वर्षांच्या कालावधीनंतर कमबॅक झालं आहे.
भारतीय संघाच्या डावाची सुरुवात करण्यासाठी लोकेश राहुल आणि शुभमन गिल उतरण्याची शक्यता आहे. एकदिवसीय मालिकेतील पराभवाचा बदला घेण्यासाठी भारतीय संघ सज्ज असणार आहे.
सलिल परांजपे नाशिक