
दिल्ली | Delhi
महिला टी२० वर्ल्ड कप २०२३ मध्ये गट फेरीतील सामने अखेरच्या टप्प्यात आहेत. मात्र आतापर्यंत केवळ दोनच संघांनी सेमीफायनलमध्ये स्थान मिळवलं आहे. यातील एका संघाने रविवारी सेमीफायनलमध्ये प्रवेश केला.
आयसीसीने सोमवारी घोषणा केली की, पाच वेळा विजेता असलेल्या ऑस्ट्रेलियानंतर आता इंग्लंडचा संघही सेमीफायनलमध्ये पोहोचला आहे. इंग्लंड बी ग्रुपमध्ये असून भारतही याच गटात आहे. भारत अजूनही सेमीफायनलमध्ये पोहोचण्याच्या शर्यतीत आहे. भारताचा आज गट फेरीतला अखेरचा सामना आयर्लंडविरुद्ध होणार आहे. जर या सामन्यात भारताने विजय मिळवला तर सेमीफायनलमध्ये पोहोचणारा भारत तिसरा संघ ठरेल.
भारतीय संघाला महिला टी२० वर्ल्ड कपची सेमीफायनल गाठायची असेल तर कोणत्याही परिस्थिती टीम इंडियाला विजय मिळवावा लागेल. भारताने हा सामना जिंकला तर ६ गुण होतील आणि इंग्लंडसोबत सेमीफायनलमध्ये प्रवेश निश्चित होईल. जर भारत पराभूत झाला तर पाकिस्तानसाठी सेमीफायनलचे दरवाजे उघडतील.
भारत विरुद्ध आयर्लंड (India Women vs Ireland Women) यांच्यातील हा सामना आज सायंकाळी ६.३० मिनिटांनी सुरू होईल. आयर्लंड संघाने ग्रुपस स्टेजमधील त्यांचे सुरुवातीचे तीन सामने मगावले आहेत आणि संघ स्पर्धेतून बाहेर देखील पडला आहे. असे असले तरी त्यांनी शेवटच्या सामन्यात वेस्ट इंडीज महिला संघाचा चांगलाच घाम काढला.
अशात भारतीय महिला खेळाडू देखील आयर्लंडला हलक्यात गेण्याची चूक करणार नाही, असेच दिसते. कर्णधार हमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) या निर्णायक सामन्यासाठी कोणत्या प्लेइंग इलेव्हनसह मैदानात येणार, याची उत्सुकता सर्वांनाच आहे.
दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
भारत: शेफाली वर्मा, स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), रिचा घोष (विकेटकीपर), शिखा पांडे, दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, रेणुका ठाकूर सिंह.
आयर्लंड: एमी हंटर, गॅबी लुईस, ओरला प्रेंडरगास्ट, लॉरा डेलेनी (कर्णधार), इमर रिचर्डसन, लुईस लिटल, मेरी वॉल्ड्रॉन (डब्ल्यूके), लेह पॉल, आर्लेन केली, कारा मरे, जेन मॅग्वायर.