IND vs WI : निर्णायक टी २० सामन्यासाठी भारत-विंडीज आज भिडणार

IND vs WI : निर्णायक टी २० सामन्यासाठी भारत-विंडीज आज भिडणार

कोलकाता | Kolkata

भारत (India) आणि विंडीज (West Indies) यांच्यातील ३ सामन्यांच्या मालिकेतील दुसरा आणि निर्णायक टी २० सामना (T20 Match) आज कोलकाताच्या ईडन गार्डन्स (Eden Gardens, kolkata) येथे सायंकाळी ६:५० वाजता खेळवण्यात येणार आहे...

आजच्या सामन्यात विजय मिळवून मालिका खिशात टाकण्यासाठी भारतीय संघ (Team India) सज्ज आहे. या मालिकेत टीम इंडियाने १-० अशी आघाडी घेतली आहे.

तर दुसरीकडे भारतावर (IND) मात करून मालिकेतील चुरस वाढवण्यासाठी विंडीज (WI) सज्ज आहे. पहिल्या सामन्यात दुखापतीमुळे बाहेर असलेला अष्टपैलू जेसन होल्डर (Jason Holder) दुखापतीतून सावरला आहे. आजच्या निर्णायक सामन्यात तो संघात परतण्याची शक्यता आहे. आजच्या सामन्यात भारतीय संघात काही बदल केले जाण्याची शक्यता आहे.

सलामीवीरांची जवाबदारी कोणाकडे?

पहिल्या टी २० सामन्यात विंडीजने विजयासाठी दिलेल्या १५८ धावसंख्येचा पाठलाग करताना रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि डावखुरा युवा यष्टीरक्षक सलामीवीर ईशान किशन (Ishan Kishan) सलामीला पुन्हा एकदा उतरणार हे जवळपास निश्चित आहे. तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली (Virat Kohli), चौथ्या स्थानी रिषभ पंत (Rishabh Pant) तर पाचव्या स्थानावर सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) खेळेल हे निश्चित आहे.

मात्र बॉलिंग ऑलराऊंडर दीपक हुडाला (Deepak Hooda) अंतिम ११ मध्ये संधी मिळाल्यास व्यंकटेश अय्यरला (Venkatesh Iyer) बाहेर बसवले जाण्याची शक्यता आहे. शिवाय लेगस्पिनर फिरकीपटू युझवेन्द्र चहल (Yuzvendra Chahal) पहिल्या सामन्यात फारच महागडा ठरला होता.

त्याच्याजागी कुलदीप यादवचा (Kuldeep Yadav) समावेश केला जाण्याची शक्यता आहे. तसेच हर्षल पटेल (Harshal Patel) पहिल्या सामन्यात आपल्या गोलंदाजीत फारशी चमक दाखवू शकला नव्हता.

त्याच्याजागी आवेश खानला (Avesh Khan) संधी मिळू शकते. तर तिसरा आणि महत्वाचा बदल म्हणजे दीपक चाहरच्या (Deepak Chahar) जागी शार्दूल ठाकूर (Shardul Thakur) किंवा मोहम्मद सिराजला (Mohammed Siraj) संधी मिळू शकते.

सलिल परांजपे, नाशिक.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com