IND vs WI : विंडीजविरुद्ध मालिकांसाठी टीम इंडियाची घोषणा; 'असा' असेल संघ

team india
team india

मुंबई | Mumbai

भारत (India) आणि विंडीज (West Indies) यांच्यातील खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय आणि टी २० मालिकेसाठी (T 20 Series) टीम इंडियाची (Team India) घोषणा करण्यात आली आहे...

दक्षिण आफ्रिका (South Africa) दौऱ्यावर कसोटी आणि एकदिवसीय मालिकेत हॅमस्ट्रिंग दुखापतीमुळे खेळू न शकलेल्या रोहित शर्माला (Rohit Sharma) विंडीजविरुद्ध मालिकेतून टीम इंडियाच्या निळ्या जर्सीत पुन्हा एकदा कर्णधार आणि एका आक्रमक फलंदाज म्हणून कमबॅक करण्याची संधी मिळणार आहे.

team india
Visual Story : अबब! 'पुष्पा'च्या आयटम साँगसाठी समांथाने आकारले पाच कोटी

दक्षिण आफ्रिकेत ३-० अशी एकदिवसीय मालिका गमावल्यांनंतर भारतीय संघात काही महत्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. भारतीय संघाने रविंद्र जडेजा, जसप्रीत बुमराह आणि मोहंमद शमीला विश्रांती देण्यात आली आहे.

टीम इंडियाचा एकदिवसीय आणि टी २० मालिकेचा उपकर्णधार लोकेश राहुल विंडीजविरुद्ध दुसऱ्या टी २० सामान्यांपासून भारतीय संघात सहभागी होणार आहे. उपकर्णधारपद लोकेश राहुल म्हणून कायम असेल.

team india
Visual Story : ‘या’ भारतीय क्रिकेटपटूनं वाढदिवशीच उरकला साखरपुडा; फोटोज व्हायरल

भारताच्या टी २० संघात आवेश खान, दीपक हुडा आणि रवी बिश्नोईला संघातून पदार्पणाची संधी मिळणार आहे. तर एकदिवसीय मालिकेसाठी दुखापतीतून सावरून नुकताच सावरलेला कुलदीप यादव एकदिवसीय संघात बऱ्याच कालावधीनंतर संघात पुन्हा परतला आहे. तसेच दीपक हुडा एकदिवसीय मालिकेतूनही पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे.

एकदिवसीय संघ

ऋतुराज गायकवाड, शिखर धवन, रोहित शर्मा, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, विराट कोहली, रिषभ पंत, दीपक हुडा, दीपक चाहर, शार्दूल ठाकूर, युझवेन्द्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, मोहंमद सिराज, प्रसिध कृष्णा, आवेश खान.

टी २० संघ

रोहित शर्मा, लोकेश राहुल, ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, व्यंकटेश अय्यर, शार्दूल ठाकूर, दीपक चाहर, रवी बिश्नोई, अक्षर पटेल, युझवेन्द्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, मोहंमद सिराज, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल.

सलिल परांजपे नाशिक

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com