Asia Cup 2023 Final : श्रीलंकेने टॉस जिंकला; प्रथम फंलदाजीचा निर्णय, भारतीय संघात मोठा बदल

'अशी' आहे दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
Asia Cup 2023 Final : श्रीलंकेने टॉस जिंकला;  प्रथम फंलदाजीचा निर्णय, भारतीय संघात मोठा बदल

कोलंबो | Colombo

आज आशिया कप २०२३ (Asia Cup 2023) मध्ये भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यात अंतिम सामना होत असून या सामन्यात भारत २०१८ नंतर पुन्हा एकदा आशिया कपवर नाव कोरण्यासाठी सज्ज झाला आहे. तर गतविजेता श्रीलंकेचा संघ त्यांचे जेतेपद कायम राखण्याचा प्रयत्न करेल. भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये अटीतटीचा सामना होण्याची शक्यता असून आशिया कपमधील हा अंतिम सामना (Final Match) पाहण्यासाठी क्रिकेट चाहते देखील उत्सुक आहेत...

Asia Cup 2023 Final : श्रीलंकेने टॉस जिंकला;  प्रथम फंलदाजीचा निर्णय, भारतीय संघात मोठा बदल
PM Narendra Modi Birthday : लहानपणीचे कष्टाळू, गुजरातचे मुख्यमंत्री ते जगातील प्रभावशाली नेते पंतप्रधान मोदी

श्रीलंकेच्या कोलंबो (Colombo) येथील आर प्रेमदास स्टेडियमवर आशिया कपचा अंतिम सामना पार पडत असून या सामन्यापूर्वी दोन्ही संघांच्या कर्णधारांमध्ये टॉस झाला. त्यात हा टॉस श्रीलंकेचा कर्णधार दासून शनाका (Dasun Shanaka) याने जिंकला असून त्याने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता भारताला पहिल्यांदा गोलंदाजी करावी लागणार आहे.

Asia Cup 2023 Final : श्रीलंकेने टॉस जिंकला;  प्रथम फंलदाजीचा निर्णय, भारतीय संघात मोठा बदल
Accident News : पर्यटकांची कार दरीत कोसळून भीषण अपघात; तीन ठार, चार जण गंभीर जखमी

दरम्यान, भारताचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) अंतिम सामन्यात संघात काही बदल केले आहेत. बांगलादेश विरुद्धच्या सुपर ४ सामन्यात रोहित शर्माने विराट कोहली, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांना विश्रांती दिली होती. त्यानंतर आजच्या अंतिम सामन्यात या चौघांनाही संधी देण्यात आली आहे. तर अक्षर पटेल (Akshar Patel) याच्या जागेवर वॉशिंगटन सुंदरला स्थान मिळाले आहे. तर श्रीलंकेच्या प्लेइंग ११ मध्ये देखील बदल करण्यात आले असून तीक्षाना दुखापतग्रस्त असल्याने त्याच्या जागी दुषण हेमंथा याचा संघात समावेश करण्यात आला आहे.

Asia Cup 2023 Final : श्रीलंकेने टॉस जिंकला;  प्रथम फंलदाजीचा निर्णय, भारतीय संघात मोठा बदल
Accident News : कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या बसला अपघात; एकाचा मृत्यू, १५ हून अधिक जखमी

भारतीय संघाची प्लेइंग इलेव्हन

रोहित शर्मा (कर्णधार) शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, इशान किशन, हार्दिक पांड्या, रविंद्र जाडेजा, वॉशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज

श्रीलंका संघाची प्लेइंग इलेव्हन

दासुन शनाका (कर्णधार) पथुम निसंका, कुसल परेरा, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदीरा समरविक्रमा, चॅरिथ असलंका, धनंजय डी सिल्वा, डुनिथ वेल्लेलागे, दुशान हेमंथा, प्रमोद मदुशन, मथीशा पथिराना

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com