
लखनौ | Lucknow
भारत (India) आणि श्रीलंका (Sri Lanka) यांच्यातील ३ सामन्यांच्या टी २० मालिकेसाठी (T 20 Series) श्रीलंका संघाने (Team Sri Lanka) आपल्या संघाची घोषणा केली आहे...
श्रीलंका संघनिवड समितीने १८ सदस्सीय संघाची घोषणा केली आहे. संघाचे कर्णधारपद दसून शनाका (Dasun Shanaka) सांभाळणार आहे. तर संघाचे उपकर्णधारपद चारीत असालंका (charith asalanka) याच्याकडे असेल.
भारत (IND) आणि श्रीलंका (Sri Lanka) संघांमध्ये ३ सामन्यांच्या टी २० मालिकेला गुरुवार २४ फेब्रुवारी २०२२ पासून सुरुवात होणार आहे. सर्व सामन्यांचे प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स आणि हॉटस्टार वाहिनीवर सायंकाळी ६:५० वाजता होणार आहे.
पहिला सामना लखनौ (Lucknow), उर्वरीत २ सामने धरमशाला (Dharamshala) येथे २६ आणि २७ फेब्रुवारी रोजी होतील. या १८ सदस्सीय संघात आघाडीचा अनुभवी फलंदाज अविष्का फर्नांडोला (Avishka Fernando) वगळण्यात आले आहे.
गुडघ्याच्या दुखापतीमुळे तो मालिकेला मुकणार आहे. त्याच्याशिवाय रमेश मेंडिस (Ramesh Mendis) आणि नुवान तुषारा (Nuwan Thushara) थम्ब फ्रॅक्चरमुळे मालिकेत खेळू शकणार नाहीत. मधल्या फळीतील फलंदाज भानुका राजपक्षे (Bhanuka Rajapaksa) याला फिटनेस समस्येमुळे संघातील आपले स्थान टिकवण्यात अपयश आले आहे.
दसून शनाका, चारीत असालंका, प्राथुम निसंका, कुशल मेंडिस, दिनेश चंडिमल, धनुष्का गुणतिलका, कामिल मिशारा, जनीत लियनगे, वनिंदूं हंसरंगा, चामिका करुणरत्ने, दुशमंत चमिरा, लाहिरू कुमारा, बिनुरा फर्नांडो, शिरन फर्नांडो, जेफ्री वेन्डरसे, महेश तीक्ष्णा, प्रवीण जयविक्रमा आणि एशियन डॅनिएल.
सलिल परांजपे, नाशिक.