IND vs SA : द. आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यातून विराट आऊट, कोणाच्या खांद्यावर कर्णधारपदाची धुरा?

IND vs SA : द. आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यातून विराट आऊट, कोणाच्या खांद्यावर कर्णधारपदाची धुरा?

दिल्ली | Delhi

भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या दुसऱ्या कसोटीला आजपासून सुरूवात होत आहे. भारतीय संघानं सेंच्युरियनवर विजय मिळवून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे आणि विराट कोहली अँड कंपनीला मालिका जिंकून इतिहास घडवण्याची संधी आहे.

२९ वर्षांत भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकता आलेली नाही आणि जोहान्सबर्गचा इतिहास पाहता भारत येथे एकही सामना हरलेला नाही. त्यामुळे हा सामना जिंकून मालिका जिंकण्याचा भारतीय संघाचा निर्धार आहे. पण, टीम इंडियाला सामना सुरू होण्यापूर्वीच मोठा धक्का बसला आहे.

भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहली हा कंबरेच्या दुखापतीमुळे या सामन्यास अनुपलब्ध असेल. त्याच्याजागी हनुमा विहारीला प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा देण्यात आली आहे. तर केएल राहुलच्या हाती नेतृत्त्वाची सूत्रे देण्यात आली आहेत.

तसेच यजमान दक्षिण आफ्रिका संघातही २ बदल करण्यात आले आहेत. क्विंटन डी कॉकच्या जागी काइल व्हेरीन आणि वियान मल्डरच्या जागी डुआन ओलिव्हियरला जागा दिली गेली आहे.

या सामन्यात कर्णधार के. एल. राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. सलामी फलंदाजीसाठी कर्णधार के. एल. राहुल आणि मयांक अगरवाल उतरले. दोघांनीही संयमी खेळी करत १० षटकांमध्ये ३२ धावा केल्या आहेत. यात मयांकने २८ चेंडूत २२ आणि राहुलने ३६ चेंडूत ९ धावा केल्या.

भारतीय कसोटी संघ

केएल राहुल (कर्णधार), मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, रिषभ पंत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज

दक्षिण आफ्रिका भारतीय कसोटी संघ

डीन एल्गर (कर्णधार), एडन मार्कराम, कीगन पीटरसन, रॅसी व्हॅन डर डुसेन, टेम्बा बावुमा, काइल वेरेन (यष्टीरक्षक), मार्को जॅन्सन, कागिसो रबाडा, केशव महाराज, डुआन ऑलिव्हियर, लुंगी एनगिडी

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com