IND VS SA Test : भारताचा दक्षिण अफ्रिकेवर विजय, कोहलीच्या नेतृत्वात केली मोठी कमाल!

IND VS SA Test : भारताचा दक्षिण अफ्रिकेवर विजय, कोहलीच्या नेतृत्वात केली मोठी कमाल!

दिल्ली | Delhi

भारतीय संघाने (Team India) सेंच्युरियन टेस्ट (Centurion Test) सामना जिंकून इतिहास घडवला आहे. सुपरस्पोर्ट पार्क येथे विजयासाठी मिळालेल्या ३०५ धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात यजमान दक्षिण आफ्रिका (South Africa) १९१ धावांवरच गारद झाली आणि भारताने ११३ धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला आहे.

या विजयासह भारताने मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. पाचव्या दिवशी भारताने दक्षिण अफ्रिकेचे ६ गडी झटपट बाद केले. दुसऱ्या डावात जसप्रीत बुमराहने ३, मोहम्मद शमीने ३, मोहम्मद सिराजने २ आणि आर. अश्विनने २ गडी बाद केले.

सेंच्युरियम मैदानावर भारताने कसोटी सामन्यात विजय मिळवण्याची ही पहिलीच वेळ आहे. इतक नाही तर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड वगळता आफ्रिकेचा या मैदानावर पराभव करणारा भारत फक्त तिसरा देश आणि आशिया खंडातील पहिला देश ठरला आहे.

दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (South Africa vs India) संघात रविवारपासून (२६ डिसेंबर) सुपरस्पोर्ट पार्क (SuperSport Park) येथे तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना सुरु झाला होता. बॉक्सिंग डे कसोटी असलेल्या या सामन्याचा आज अखेरचा दिवस होता.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com