IND vs SA : भारत-दक्षिण आफ्रिका पहिल्या कसोटीत केवळ 'रिकाम्या खुर्च्या'

IND vs SA : भारत-दक्षिण आफ्रिका पहिल्या कसोटीत केवळ 'रिकाम्या खुर्च्या'
File Photo

सेंच्युरियन | Centurion

भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यातील ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेला (Test Series) रविवारी २६ डिसेंबरपासून सेंच्युरियनच्या सुपर स्पोर्ट्स पार्क मैदानावर सुरुवात होणार आहे...

सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स आणि हॉटस्टार वाहिनीवर भारतीय वेळेनुसार दुपारी दीड वाजता करण्यात येणार आहे. भारतीय कसोटी क्रिकेट संघाला (Indian Cricket Team) मागील २९ वर्षांपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (SA) कसोटी मालिका जिंकण्यात अपयश आले आहे. मात्र मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी भारतीय कसोटी क्रिकेट संघाच्या चिंतेत भर पडली आहे.

भारतीय संघाचा नियमित सलामीवीर रोहित शर्मा (Rohit Sharma) हॅमस्ट्रिंग दुखापतीमुळे कसोटी मालिकेला मुकणार आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या डावाची सुरुवात करण्याची जवाबदारी लोकेश राहुल (Lokesh Rahul) आणि मयंक अगरवाल (mayank agarwal) या दोघांवर असणार आहे. रोहित शर्मा दुखापतग्रस्त असल्यामुळे भारतीय संघनिवड समितीने भारतीय कसोटी क्रिकेट संघाचे उपकर्णधारपद अजिंक्य रहाणे ऐवजी लोकेश राहुलच्या खांदयावर सोपवले आहे.

भारतीय कसोटी क्रिकेट संघासाठी जमेची बाजू म्हणजे सलामीवीर मयंक अगरवाल तुफान फॉर्मात आहे. मात्र चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे सध्या मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले आहेत. मायदेशात न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेतही दोन्ही अनुभवी फलंदाज अपयशी ठरले होते.

तर पहिल्या कानपूर कसोटीत विराट कोहली आणि दुसऱ्या कसोटीत सलामीवीर लोकेश राहुलऐवजी संघात स्थान मिळालेल्या मुंबईकर फलंदाज श्रेयस अय्यरने आपल्या २ डावांमध्ये १ शतक आणि १ अर्धशक झळकावून कर्णधार विराट कोहलीची चिंता वाढवली आहे.

अजिंक्य रहाणेची भारतीय संघातील जागा घेण्यासाठी शार्दूल ठाकूर, श्रेयस अय्यर आणि हनुमा विहारी शर्यतीत आहेत. त्यामुळे पहिल्या कसोटीत अंतिम ११ चा संघात अजिंक्य रहाणेला संधी मिळणार का? ते पाहणे महत्वाचे असणार आहे.

शिवाय जसप्रीत बुमराह आणि मोहंमद शमी संघात परतल्यामुळे भारताची गोलंदाजी अधिक मजबूत झाली आहे. तर दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व डीन एल्गार करणार आहे. तर उपकर्णधारपद टेम्बा बाऊमकडे असेल. दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यातील कसोटी मालिकेत दक्षिण आफ्रिकेने भारतावर कायमच दबदबा राखला आहे. ही परंपरा अशीच कायम ठेवण्यासाठी आफ्रिका प्रयत्न करेल.

दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजीची मदार टेम्बा बाऊमा, डीन एल्गार, रुसी वेन्डर डू सेन, एडन मार्क्रम, सरल एरवी, कीयन पीटरसन क्विंटन डिकॉक आहेत. अष्टपैलूंमध्ये जॉर्ज लिंडे, वियान माल्दार, मार्को जेन्सन आहेत गोलंदाजीत दुवान ऑलिव्हर, एन्रिक नोकिया, कांगिसो रबाडा, केशव महाराज, लुंगी इंगिडी, सिसंदा मागला आहेत.

भारताच्या फलंदाजीची मदार लोकेश राहुल, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, विराट कोहली, प्रियांक पांचाळ, श्रेयस अय्यर रिषभ पंत, वृद्धिमान सहा यांच्यावर असणार आहे अष्टपैलूंमध्ये आर अश्विन, हनुमा विहारी, शार्दूल ठाकूर आहेत गोलंदाजीत मोहंमद शमी, जसप्रीत बुमराह, ईशांत शर्मा, उमेश यादव आणि जयंत यादव मोहंमद सिराज आहेत.

दक्षिण आफ्रिका (SA) आणि भारत (IND) यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात मैदानात प्रेक्षकांना नो एंट्री असणार आहे. दक्षिण आफ्रिकेत ओमायक्रॉन विषाणूने धुमाकूळ घातल्यामुळे दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डानं हा कठोर निर्णय घेतला आहे. बीसीसीआयने (BCCI) याला आपली संमती दर्शवली आहे. त्यामुळे पहिल्या सामन्यात प्रेक्षकांना प्रवेश नसल्यामुळे क्रिकेट चाहत्यांचा हिरमोड होण्याची शक्यता आहे.

सलिल परांजपे, नाशिक.

Related Stories

No stories found.