IND vs SA : भारत-दक्षिण आफ्रिकामध्ये आज निर्णायक सामना; भारत विजयाची हॅट्ट्रीक साधणार?

IND vs SA : भारत-दक्षिण आफ्रिकामध्ये आज निर्णायक सामना; भारत विजयाची हॅट्ट्रीक साधणार?

मुंबई । Mumbai

भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात पाच सामन्यांची टी-20 मालिका (IND vs SA T20 Series) सुरु आहे. या मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक सामना रविवारी (१९ जून) बंगळुरू येथे एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जाणार आहे.

या मालिकेतील आतापर्यंत चार सामने पार पडले आहेत. त्यापैकी प्रत्येकी दोन सामने दोन्ही संघाने जिंकले आहेत. भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघाचे दृष्टीने महत्वाचा आहे. कारण आज जो संघ सामना जिंकेल, तो संघ मालिका आपल्या नावे करेल.

दरम्यान हा सामना जिंकूण, कर्णधार ऋषभ पंत आणि भारतीय संघाकडे इतिहास रचण्याची संधी आहे. जर भारताने हा सामना जिंकला तर तो एक विक्रम करेल. ०-२ ने पिछाडीवर गेल्यानंतर ३-२ अशी मालिका जिंकणारा तो जगातील पहिला संघ ठरेल. त्याचबरोबर, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध घरच्या मैदानावर टी २० मालिका जिंकणारा ऋषभ पंत पहिला भारतीय कर्णधार होईल.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com