IND vs SA 2nd T20 : आज भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरा सामना, कुणाचे पारडे जड?

IND vs SA 2nd T20 : आज भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरा सामना, कुणाचे पारडे जड?

कटक | Cuttack

भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) संघांमध्ये सध्या पाच टी २० सामन्यांची मालिका (T-20 Series) सुरु आहे. या मालिकेत अरुण जेटली दिल्ली येथील पहिला सामना जिंकून दक्षिण आफ्रिकेने १-० अशी आघाडी घेतली आहे...

आता कटकमधील दुसरा सामना दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. आजच्या सामन्यात विजय मिळवून मालिकेत २-० अशी विजयी आघाडी संपादन करण्याचा दक्षिण आफ्रिकेचा मानस आहे.

तर दुसरीकडे मालिकेत १-१ ने बरोबरी साधण्यासाठी भारत सज्ज आहे. सामना सायंकाळी ६:५० वाजता खेळवण्यात येणार आहे. सामन्याचे प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स आणि हॉटस्टार वाहिनीवर करण्यात येणार आहे.

२०१५ मध्ये भारत (IND) आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये (SA) कटक येथे बाराबती स्टेडियमवर झालेल्या सामन्यात भारताचा ६ विकेट्सने पराभव झाला होता. आता तब्बल ७ वर्षांनी पुन्हा एकदा भारत (India) आणि दक्षिण आफ्रिकेत (South Africa) सामना होणार आहे.

काटकची खेळपट्टी गोलंदाजांसाठी वरदान मानली जाते. दोन्ही संघांमध्ये अनेक चांगले गोलंदाज आहेत. भारताकडून या मैदानावर युझवेन्द्र चहलने ४ तर अष्टपैलू हार्दिक पंड्याने गोलंदाजीत ३ विकेट्स काढल्या आहेत.

आजच्या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघात एकही बदल अपेक्षित नाही. तर दुसरीकडे भारतीय संघात पहिल्या सामन्यात गोलंदाजीत महागड्या ठरलेल्या हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमारच्या जागेवर युवा गोलंदाज उमरान मलिकला अंतिम ११ मध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे. आजच्या सामन्यात रिषभ पंत, ईशान किशन, श्रेयस अय्यर, रासी वेन्डर डू सेन, डेविड मिलर हे स्टार प्लेअर्स असतील.

सलिल परांजपे, नाशिक.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com