IND vs PAK : भारत-पाकिस्तान सामन्यावर पावसाचा धोका? जाणून घ्या हवामान रिपोर्ट

IND vs PAK : भारत-पाकिस्तान सामन्यावर पावसाचा धोका? जाणून घ्या हवामान रिपोर्ट

मुंबई | Mumbai

टी-२० विश्वचषक २०२२ मध्ये, आज (२३ ऑक्टोबर) दुपारी १.३० वाजता भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात जंगी सामना खेळवला जाईल. गतवर्षीच्या आणि आशिया चषकातील पराभवही बदल घेण्यासाठी भारतीय संघाने कसून तयारी केली आहे. आजचा सामन्यात विजय मिळवत भारतवासियांना दिवाळीचं गिफ्ट देण्याचा संघाचा प्रयत्न असेल.

पण भारत पाकिस्तान सामन्यावर पावसाचं सावटं आहे. जगभरातल्या क्रिकेटच्या चाहत्यांना आतुरता असलेला सामना होणार का ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. शनिवारी सकाळी मेलबर्नमध्ये सलग सहा तास पाऊस पडला. त्याचबरोबर पाऊस येतोय कधी थांबतोय अशी स्थिती आहे. त्यामुळे चाहते निराश असल्याचे सोशल मीडियावर स्पष्ट दिसत आहे. तसेच कमी षटकांचा सामना झाला तर, तो किती षटकाचा होईल अशी देखील चर्चा सोशल मीडियावर जोरात सुरु आहे.

संभाव्य संघ

भारत :

रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवीचंद्रन अश्विन, हर्षल पटेल, मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार.

पाकिस्तान :

बाबर आझम, मोहम्मद रिझवान, शान मसूद, हैदर अली, इफ्तिखार अहमद, आसिफ अली, शादाब खान, मोहम्मद नवाज, नसीम शाह, हॅरिस रौफ आणि शाहीन शाह आफ्रिदी.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com