भारतीय संघ पाक दौऱ्यावर कधी येणार? रोहित शर्माने दिले मजेशीर उत्तर

भारतीय संघ पाक दौऱ्यावर कधी येणार? रोहित शर्माने दिले मजेशीर उत्तर

मुंबई | Mumbai

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा पाकिस्तानशी दोन हात करण्यासाठी सज्ज आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान संघात रविवारी (२८ ऑगस्ट) दुबईच्या दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आशिया चषक २०२२ मधील दुसरा सामना खेळला जाणार आहे.

या हाय व्होल्टेज लढतीपूर्वी रोहितने पत्रकार परिषदेत विविध प्रश्नांची उत्तरे दिली. यादरम्यान एका पाकिस्तानी पत्रकाराने रोहितला पाक दौऱ्यावर कधी येणार असा प्रश्न विचारला. यावर रोहित म्हणाला, 'जर माझ्याकडे या प्रश्नाचे उत्तर असते तर मी नक्कीच दिले असते. ही गोष्ट तर बॉर्डस् ठरवते की काय करायचे आणि काय नाही. या गोष्टी माझ्या हातात नाही. आम्ही जी मालिका समोर दिसते तेथे खेळण्यास जातो. आम्हाला येथे पाठवले जाईल तेथे खेळू. हा फार अवघड प्रश्न आहे. बोर्डाने निर्णय घेतला तर आम्ही नक्की खेळू.'

भारताने २००८ पासून पाकिस्तानचा दौरा केलेला नाही. राजकीय आणि राजनैतिक संबंधांमुळे दोन्ही देशांच्या टीम अद्याप द्विपक्षीय मालिका खेळत नाहीत. २०१२-१३ मध्ये भारतीय भूमीवर दोन्ही देशांदरम्यान शेवटची द्विपक्षीय मालिका झाली होती. त्यानंतर पाकिस्तानने तीन एकदिवसीय आणि दोन टी-२० सामन्यांसाठी भारताचा दौरा केला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com