IND Vs NZ : न्यूझीलंडने भारतासमोर ठेवले २७४ धावांचे आव्हान; मोहम्मद शमीची भेदक गोलंदाजी

IND Vs NZ : न्यूझीलंडने भारतासमोर ठेवले २७४ धावांचे आव्हान; मोहम्मद शमीची भेदक गोलंदाजी

मुंबई | Mumbai

आज एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारत आणि न्यूझीलंड (India and New Zealand) यांच्यात सामना होत असून न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत १० गडी गमावत २७३ धावापर्यंत माजली मारली. त्यामुळे भारताला (India) विजयासाठी २७४ धावांचे आव्हान मिळाले आहे. न्यूझीलंडकडून डॅरेल मिचेल याने १३० तर रचित रवींद्र याने ७५ आणि ग्लेन फिलिप्सने २३ धावांची खेळी केली. या तिघांव्यतिरिक्त केवळ विल यंग (१७ धावा) दुहेरी आकडा गाठू शकला...

IND Vs NZ : न्यूझीलंडने भारतासमोर ठेवले २७४ धावांचे आव्हान; मोहम्मद शमीची भेदक गोलंदाजी
मुंबई पोलीस ड्रग्ज माफिया ललित पाटीलला घेऊन नाशकात; कारखान्याच्या ठिकाणी केली चौकशी

भारताचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) नाणेपेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर भारताच्या गोलंदाजांनी चांगली सुरुवात केली. १९ धावांवर दोन्ही सलामी फलंदाजांना तंबूत धाडले. यानंतर डेवेन कॉनवे याला मोहम्मद सिराजने शून्यावर तंबूत धाडले. तर दुसरा सलामी फलंदाज विल यंग याला १९ धावांवर मोहम्मद शमीने तंबूचा रस्ता दाखवला. विल यंगने २७ चेंडूत तीन चौकारांच्या मदतीने १९ धावांचे योगदान दिले. दोन गडी झटपट गेल्यानंतर रचित रविंद्र आणि डॅरेल मिचेल यांनी डाव सावरला. कर्णधार टॉप लेथम याला मोठी खेळी करता आली नाही. त्याने सात चेंडूत फक्त पाच धावा केल्या. लेथमला कुलदीप यादवने तंबूचा रस्ता दाखवला. डॅरेल मिचेल आणि रचित रविंद्र यांनी तिसऱ्या विकेटसाठी १५२ चेंडूमध्ये १५९ धावांची भागीदारी केली.

IND Vs NZ : न्यूझीलंडने भारतासमोर ठेवले २७४ धावांचे आव्हान; मोहम्मद शमीची भेदक गोलंदाजी
NCP News : राष्ट्रवादीतील फुटीनंतर शरद पवार-अजित पवार एकाच व्यासपीठावर; कार्यक्रमात काय बोलणार?

दरम्यान, यंदाच्या विश्वचषकात पहिला सामना खेळणाऱ्या मोहम्मद शमीने (Mohammed Shami) दहा षटकात ५४ धावा देत पाच गडी बाद केले. तर जसप्रीत बुमराहने १० षटकात ४५ धावा कर्च केल्या. यामध्ये एक षटक निर्धाव टाकले. तसेच कुलदीप यादवने १० षटकात ७३ धावा खर्च करत दोन फलंदाजांना तंबूत धाडले. मोहम्मद सिराजने १० षटकांमध्ये फक्त ४५ धावा देत एक गडी बाद केला. तर रवींद्र जाडेजाने १० षटकांत ४८ धावा खर्च केल्या.

'देशदूत' / 'सार्वमत'चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

IND Vs NZ : न्यूझीलंडने भारतासमोर ठेवले २७४ धावांचे आव्हान; मोहम्मद शमीची भेदक गोलंदाजी
Rohit Pawar : "अजित पवार अर्थमंत्री पण फडणवीसांकडून..."; रोहित पवारांचा गंभीर आरोप
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com