IND vs NZ : भारताविरुद्ध कसोटी मालिकेसाठी किवी संघाची घोषणा

IND vs NZ : भारताविरुद्ध कसोटी मालिकेसाठी किवी संघाची घोषणा

कानपूर | Kanpur

जून २०२१ मध्ये झालेल्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (ICC World Test Championship) स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय क्रिकेट संघावर (Indian Cricket Team) अंतिम सामन्यात ८ गडी राखून निर्विवाद वर्चस्व राखून पहिल्या पर्वाचे विजेतेपद न्यूझीलंड संघाने (New Zealand) मिळवले...

न्यूझीलंडने २०२३ मध्ये होणाऱ्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी नव्याने तयारी करण्यास सुरुवात केली आहे.

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप कसोटी स्पर्धेसाठी न्यूझीलंड संघाने आगामी २५ नोव्हेंबर ते ७ डिसेंबर या कालावधीत खेळल्या जाणाऱ्या २ सामन्यांच्या मालिकेसाठी आपला १५ सदस्सीय चमू आज जाहीर केला आहे.

या सामन्यांच्या मालिकेतून अनुभवी डावखुरा तेज गोलंदाज ट्रेंट बोल्ट आणि अनुभवी अष्टपैलू कोलिंदी ग्रँडहोमने सततच्या बायोबबलमधून काही काळ विश्रांती मिळण्यासाठी न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाकडे अर्ज केला होता. या अर्जाला न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने मान्यता दिली आहे.

भारतातील खेळपट्ट्या फिरकी गोलंदाजांना अनुकूल असल्याने न्यूझीलंड संघाने आपल्या संघात ५ फिरकीपटू़ंंना संघात स्थान दिले आहे. अयाज पटेल, रुचीद रविंद्र, मिचेल सॅन्टेनर, ग्लेन फिलिप्स, विल समरविले यांना संधी दिली आहे.

न्यूझीलंड कसोटी संघ

टॉम ब्लँडेल, डेवीन कॉन्व्हे, केन विलियम्सन, हेन्री निकल्स, टॉम लेथम, ग्लेन फिलिप्स, एजाज पटेल, रुचिन रविंद्र, विल समरविले, मिचेल सॅन्टेनर, विल यंग, रॉस टेलर, टीम साऊदी, नील वेगनर, कायल जेमिसन

सलिल परांजपे, नाशिक.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com