IND vs NZ : भारताविरुद्ध टी २० मालिकेसाठी किवी संघ जाहीर

IND vs NZ : भारताविरुद्ध टी २० मालिकेसाठी किवी संघ जाहीर

मुंबई | Mumbai

भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) या दोन संघांमध्ये ३ टी २० (T20) सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. हे सर्व ३ सामने जयपूरच्या सवाई मानसिंग मैदान, रांचीच्या झारखंड स्टेट क्रिकेट असोसिएशन आणि कोलकाताच्या ईडन गार्डन्स या मैदानावर होणार आहेत...

पहिला सामना उद्या बुधवारी जयपूर येथे होणार आहे. सर्व सामने सायंकाळी ७:३० वाजता खेळवण्यात येतील. सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स आणि हॉटस्टार वाहिनीवर करण्यात येणार आहे.

आयसीसी टी २० वर्ल्डकप २०२१ मध्ये (ICC T20 World Cup 2021) साखळीतच गाशा गुंडाळून मायदेशी परतलेल्या भारतीय संघ पुढील वर्षी २०२२ मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात टी २० वर्ल्डकप होणार आहे. या विश्वचषकाची तयारी करण्याची संधी भारत आणि किवी संघाला मिळणार आहे.

२०२१ टी २० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडला पराभूत करून पहिले विजेतेपद पटकावल्यामुळे न्यूझीलंड संघाचे विश्वचषक विजेतेपद जिंकण्याचे स्वप्न अधुरे राहिले.

आता ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी २० विश्वचषकासाठी तयारी करण्यासाठी न्यूझीलंड भारतीय संघाविरुद्ध टी २० मालिका (T20 Series) खेळणार आहे. या मालिकेसाठी किवी संघाने आपला टी २० संघ जाहीर केला आहे.

शिवाय २०२० साली न्यूझीलंडमध्ये झालेल्या ५ टी २० सामन्यांच्या मालिकेत भारताने किवी संघाला ३-२ असे पराभूत केले होते. याचा वचपा काढण्यासाठी न्यूझीलंड टी २० मालिकेत काय रणनीती आखतो? ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे. भारताविरुद्धची टी २० मालिका केन विल्यमसन खेळणार नसल्याने टीम साउथी संघाचा कर्णधार असणार आहे.

न्यूझीलंड संघ

ट्रेंट बोल्ट, लौकी फेर्गसन, टीम साऊदी, टीम सैफरीट, मार्क चेपमेन, डेरेल मिचेल, मार्टिन गप्टिल, काईल जेमिसन, जेम्स निशम, ग्लेन फिलिप्स, मिचेल सॅन्टेनर, ईश सोधी, एडम मिल्ने.

सलिल परांजपे, नाशिक.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com