IND vs NZ : भारत 'क्लीन स्वीप'साठी सज्ज

IND vs NZ : भारत 'क्लीन स्वीप'साठी सज्ज
aniruddha joshi

कोलकाता | Kolkata

भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यातील ३ सामान्यांच्या टी २० मालिकेतील (T20 Series) तिसरा आणि अंतिम सामना आज कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानावर सायंकाळी ६:५० ला खेळवण्यात येणार आहे...

रांची आणि जयपूरमधील सलामी २ सामने जिंकून भारतीय संघाने (Indian Cricket Team) टी २० मालिका आपल्या खिशात टाकली आहे. आता आजच्या सामन्यात विजय मिळवून मालिकेवर ३-० असे निर्भेळ यश संपादन करण्यासाठी रोहित शर्मा ॲण्ड कंपनी सज्ज आहे.

तर दुसरीकडे सुरुवातीचे २ सामने पराभूत झाल्यामुळे न्यूझीलंड संघासाठी हा सामना एक औपचारिकता असणार आहे. सामना जिकून मालिकेचा शेवट गोड करून कसोटी मालिकेत आत्मविश्वासाने उतरण्याचा न्यूझीलंड संघाचा मानस असणार आहे.

भारतीय टी २० संघाचा नवीन कर्णधार रोहित शर्मासाठी (Rohit Sharma) ईडन गार्डन्स मैदान फलदायी ठरले. आयपीएलमध्ये २०१२ साली कोलकाताविरुद्ध मुंबई इंडियन्सकडून खेळताना १०९ धावांची खेळी करत रोहित शर्माने आयपीएलमधील आपले पहिले शतक साजरे केले होते.

२०१५ साली चेन्नई सुपरकिंग्जविरुद्ध अंतिम सामन्यात शानदार अर्धशतकी खेळी साकारून मुंबईला २०० चा टप्पा पार करून दिला होता. आता आज होणाऱ्या अखेरच्या सामन्यात अशीच अविस्मरणीय खेळी रोहित शर्मा साकारणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

आजच्या सामन्यात सलामीवीर लोकेश राहुलला विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे. त्याच्याजागी ऋतुराज गायकवाडला संधी मिळू शकते. याचा संपूर्ण निर्णय नाणेफेकीच्या दरम्यान स्पष्ट केला जाऊ शकतो.

सलिल परांजपे, नाशिक.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com