IND vs NZ : न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेसाठी 'अशी' असेल टीम इंडिया

IND vs NZ : न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेसाठी 'अशी' असेल टीम इंडिया

कानपूर | Kanpur

येत्या २५ नोव्हेंबर ते ७ डिसेंबर या कालावधीत भारत (India) आणि न्यूझीलंड (New New Zealand) यांच्यातील २ सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे...

या मालिकेत २ कसोटी सामने कानपूरच्या ग्रीन पार्क मैदानावर आणि मुंबईच्या वानखेडे मैदानावर खेळवण्यात येणार आहेत. सर्व सामने सकाळी ९:२० वाजता सुरु होणार आहेत. सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स आणि हॉटस्टार वाहिनीवर करण्यात येणार आहे. आज काही वेळापूर्वीच न्यूझीलंड संघाने (NZ) आपला कसोटी संघ जाहीर केला आहे.

यापाठोपाठ भारतीय क्रिकेट मंडळानेदेखील (BCCI) कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची (Team India) घोषणा केली. संघातून शार्दूल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहंमद शमी, रोहित शर्मा आणि यष्टीरक्षक रिषभ पंतला विश्रांती देण्यात आली आहे.

मुंबईकर अनुभवी फलंदाज श्रेयस अय्यरला या मालिकेतून कसोटी पदार्पणाची संधी देण्यात आली आहे. शिवाय पहिल्या कसोटीत अजिंक्य रहाणे भारताचे (IND) नेतृत्व करणार आहे. तर दुसऱ्या कसोटीत विराट कोहली संघात पुनरागमन करेल व तो संघाचं नेतृत्व करताना दिसणार आहे.

नियमित अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान सहा यष्टीरक्षक असणार आहे. तसेच आयपीएल २०२१ च्या यूएईतील दुसऱ्या पर्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघाचं प्रतिनिधित्व करणारा के. एस. भरतला वृद्धिमान सहाचा पर्यायी यष्टीरक्षक म्हणून संधी मिळाली आहे. चेतेश्वर पुजारा संघाचा उपकर्णधार असेल.

भारतीय कसोटी संघ

लोकेश राहुल, शुभमन गील, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, श्रेयस अय्यर, अजिंक्य रहाणे, वृद्धिमान सहा, के .एस. भरत, आर. अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, ईशांत शर्मा, उमेश यादव, प्रसिद्ध कृष्णा, मोहंमद सिराज, जयंत यादव.

सलिल परांजपे, नाशिक.

Related Stories

No stories found.