IND vs ENG : इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीसाठी भारतीय संघ जाहीर, पाहा कोण IN, कोण OUT!

IND vs ENG : इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीसाठी भारतीय संघ जाहीर, पाहा कोण IN, कोण OUT!

मुंबई | Mumbai

इंग्लंड विरुद्ध भारत (india vs england) यांच्यात गुरुवारपासून (०२ सप्टेंबर) केनिंग्टन ओव्हल स्टेडियम, लंडन येथे चौथा कसोटी सामना (India vs England 4th Test) खेळला जाणार आहे. चौथ्या कसोटीसाठी BCCI नं संघ जाहीर केला. संघात नेमका कोणकोणत्या खेळाडूंचा समावेश असेल याचा उलगडा बीसीसायकडून ट्विटरच्या माध्यमातून करण्यात आला आहे.

चौथ्या कसोटीसाठी भारतीय संघ:

रोहित शर्मा, केएल राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, रिषभ पंत (यष्टीरक्षक), आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), अभिमन्यू ईश्वरन, पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव, प्रसिद्ध कृष्णा

चौथ्या सामन्यासाठी वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाला संधी देण्यात आली आहे. प्रसिद्ध कृष्णाने भारतासाठी तीन एकदिवसीय सामन्यात सहा विकेट घेतले आहे. या वर्षी मार्च महिन्यात झालेल्या इंग्लंडविरुद्ध वनडे क्रिकेट आपल्या डेब्यू सामन्यात चार विकेट घेतले होते.

दरम्यान, इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील कसोटी मालिका सध्या १-१ ने बरोबरीत आहे. नॉटिंघम येथे झालेला पहिला कसोटी सामना पावसामुळे अनिर्णीत राहिला होता. त्यानंतर लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर दमदार प्रदर्शन करत भारताने इंग्लंडला पराभूत केले होते. पुढे लीड्स येथे झालेल्या तिसऱ्या सामन्यात इंग्लंडने मागील पराभवाचा वचपा काढत भारतीय संघाला एका डाव आणि ७४ धावांची धूळ चारली. अशाप्रकारे ही मालिका १-१ ने बरोबरीत आहे. त्यामुळे उभय संघांमध्ये होणारा येता चौथा कसोटी सामना महत्त्वाचा असणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com