Ind vs Eng T-20 : इंग्लंडविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर

'या' खेळाडूंचा संघात समावेश
Ind vs Eng T-20 : इंग्लंडविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर

मुंबई l Mumbai

इंग्लंड विरुद्धच्या आगामी टी-20 मालिकेसाठी बीसीसीआय (BCCI) भारतीय संघाची घोषणा केली आहे. मालिका सुरु होण्याआधी १५ दिवस संघाची घोषणा केली आहे. भारताच्या या १९ सदस्यीय टी-20 संघात नवख्या खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.

भारतीय संघाच्या कर्णधारपदाची धुरा ही विराट कोहलीकडे असणार आहे. या मालिकेसाठी IPL मध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या सुर्यकुमार यादव, राहुल तेवतिया आणि इशान किशन या तिघांना संधी देण्यात आली आहे. तर इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात आली आहे, तर भुवनेश्वर कुमारचं बऱ्याच कालावधीनंतर भारतीय संघामध्ये पुनरागमन झालं आहे.

यंदाच्या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारतात टी-20 वर्ल्ड कप होणार आहे, त्यामुळे ही मालिका महत्त्वाची मानली जात आहे. भारताच्या टी-20 संघामधून संजू सॅमसनला डच्चू देण्यात आला आहे. तर रविंद्र जडेजा अजूनही दुखापतीतून बरा झाला नसल्यामुळे अक्षर पटेलला टी-20 संघामध्ये संधी देण्यात आली आहे.

..असा आहे टी20 मालिकेसाठी भारतीय संघ

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा(उपकर्णधार), केएल राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, सुर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, रिषभ पंत(यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), युझवेंद्र चहल, वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल, वाॅशिंग्टन सुंदर, राहुल तेवतिया, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार, दिपक चहार, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर.

टी-20 मालिकेचं वेळापत्रक

12 मार्च- पहिली टी-20

14 मार्च- दुसरी टी-20

16 मार्च- तिसरी टी-20

18 मार्च- चौथी टी-20

20 मार्च- पाचवी टी-20

या टी 20 मालिकेतील सर्व सामने अहमदाबादमधील मोटेरा स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहेत. या पाचही सामन्यांचे आयोजन 1 दिवसाच्या अंतराने करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या सर्व सामन्यांना संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. दरम्यान टीम इंडियाने आतापर्यंत सलग पाच वेळा टी 20 मालिका जिंकण्याची कामगिरी केली आहे.

..असा आहे टी 20 मालिकेसाठी इंग्लंड संघ

इयन मॉर्गन (कॅप्टन), मोईन अली, जोफ्रा आर्चर, जॉनी बेयरस्टो, सॅम बिलींग्ज, जोस बटलर, सॅम करन, टॉम करन, ख्रिस जॉर्डन, लियाम लिंग्विनस्टोन, डेविड मलान, आदिल राशिद, जेसन रॉय, बेन स्टोक्स, रिस टोपेल आणि मार्क वुड.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com