भारताचा दुसरा डाव आटोपला; इंग्लंडसमोर विजयासाठी ३७८ धावांचे आव्हान

भारताचा दुसरा डाव आटोपला; इंग्लंडसमोर विजयासाठी ३७८ धावांचे आव्हान

एजबॅस्टन । Edgbaston

भारत आणि इंग्लंड यांच्यामधील पाचवी टेस्ट (India vs England 5th Test) रोमांचक अवस्थेमध्ये पोहोचली असून भारताचा दुसरा डाव २४५ धावांवर आटोपला आहे. पहिल्या डावात (first inning) भारताला मिळालेल्या १३२ धावांच्या आघाडीमुळे आता इंग्लंडला (England) विजयासाठी ३७८ धावांची आवश्यकता आहे...

भारताच्या पहिल्या डावातील ४१६ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा संपूर्ण संघ २८४ धावांत तंबूत परतला. १३२ धावांची आघाडी घेऊन मैदानावर उतरलेल्या भारतीय संघाला (Indian team) दुसऱ्या डावात साजेशी सुरुवात करता आली नाही. शुबमन गिल (४), हनुमा विहारी ( ११) व विराट कोहली (२०) माघारी परतल्यानंतर चेतेश्वर पुजारा व रिषभ पंतने ७८ धावांची भागीदारी करून भारताचा डाव सावरला. पुजारा १६८ चेंडूंत ८ चौकारांच्या मदतीने ६६ धावांवर माघारी परतला, तर रिषभनेही ८६ चेंडूंत ५७ धावा केल्या. तर जडेजाने दुसऱ्या डावात २३ तर शार्दुल ठाकूरने ४ धावा केल्या.

दरम्यान, या सामन्यात नाणेफेक जिंकून इंग्लंडने गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यानंतर ऋषभ पंत (Rishabh Pant) आणि रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) यांच्या शतकाच्या मदतीने भारताने पहिल्या डावात ४१६ धावांपर्यंत मजल मारली. तर इंग्लंडकडून जेम्स अंडरसनने ५ आणि मॅटी पॉट्सने २ बळी घेतले. याशिवाय ब्रॉड, स्टोक्स आणि रूट यांना प्रत्येकी १ -१ बळी टिपण्यात यश आले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com