दिल्ली l Delhi

चेन्नई येथील एम. ए चिदंबरम स्टेडियमवर पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंड संघाने यजमान भारतीय संघावर २२८ धावांनी मात करत विजय सलामी दिली आणि चार सामन्यांच्या मालिकेत ०-१ अशी आघाडी घेतली आहे.

भारत विरुद्ध इंग्लंड संघात एमए चिदंबरम स्टेडियम (चेपॉक स्टेडियम) येथे पार पडलेल्या सामन्यात इंग्लंडने २२७ धावांनी विजय मिळवला आहे. याबरोबरच ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. इंग्लंडने भारताला या सामन्यात ४२० धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला ५८.१ षटकात सर्वबाद १९२ धावाच करता आल्या. या डावात भारताकडून कर्णधार विराट कोहलीने सर्वाधिक ७२ धावा केल्या. त्याच्यापाठोपाठ शुबमन गिलने ५० धावांची खेळी केली. अन्य कोणत्याही फलंदाजाला २० धावांचा टप्पाही पार करता आला नाही. इंग्लंडकडून या डावात जॅक लीचने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तर जेम्स अँडरसनने ३ विकेट्स घेतल्या. याशिवाय डॉमनिक बेस बेन स्टोक्सने आणि जोफ्रा आर्चरने प्रत्येकी १ विकेट घेतली.

दरम्यान, चेन्नई येथे होणाऱ्या प्रत्येकी कसोटी सामन्यात नाणेफेकीचा कौल महत्वाचा ठरत आला आहे. पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जो रुटने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय इंग्लंडच्या विजयासाठी महत्वाचा ठरला. तसेच जो रुट यानं भारतीय फिरकी गोलंदाजीचा यशस्वी सामना करत द्विशतकी खेळी केली. जो रुट यानं पहिल्या कसोटी सामन्यात २१८ धावांची खेळी करत मोठी धावसंख्या उभारण्यात सिंहाचा वाटा उचलला. भारतीय गोलंदाजांकडे इंग्लंडच्या फलंदाजांना कसं बाद करायचं याची कसलीही योजना दिसली नाही. दुसर्या डावात गोलंदाजांनी पुनरागमन केलं पण तोपर्यंत बराच उशीर झाला होता. रुटच्या अर्धशतकाच्या बळावर पहिल्या डावांत इंग्लंड संघानं ५७८ धावांचा डोंगर उभा केला. जो रुट याच्या नेतृत्व शैलीनं इंग्लंडच्या विजयात मोलाचा वाटा उचलला आहे. गोलंदाजाचा योग्य पद्धतीनं वापर केला. शिवाय पहिल्या डावांत मिळालेल्या मोठ्या आघाडीनंतरही फॉलोऑन देण्याचा निर्णय न घेता फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सामन्यादरम्यान असे अनेक निर्णय घेत जो रुटनं इंग्लंडला विजय मिळवून दिला.

तीन फिरकीपटूंना संघात स्थान देण्याची योजना भारतीय संघाचू अपयशी ठरली आहे. आर. अश्निनचा अपवाद वगळता सुंदर आणि नदीम यांना आपला प्रभाव पाडता आला नाही. तसेच अननुभवी फिरकी गोलंदाज लीड आणि बेस यांच्या जाळ्यात भारतीय दिग्गज फलंदाज अडकले. पहिल्या डावात विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारासारखे दिग्गज फलंदाज फिरकीच्या जाळ्यात अडकले. पहिल्या सामन्यात इंग्लंडच्या दोन फिरकीपटूंनी ११ बळी घेतले आहेत. तसेच दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघासमोर ४२० धावांच लक्ष्य होतं. एवढ्या मोठ्या धावांचा पाठलाग करताना, प्रत्येक खेळाडूकडून संयमाची खेळी अपेक्षित होती. मात्र विराट कोहली आणि शुभमन गिल वगळता एकाही भारतीय खेळाडूल १५ पेक्षा अधिक धावा करता आल्या नाहीत. भारतीय संघातील आघाडीचे आणि अनुभवी रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे यांची खराब कामगिरी पराभवाचं कारण आहे. दोन्ही डावांत रोहित-रहाणेला मोठी खेळी करण्यात अपयश आलं आहे. अजिंक्य रहाणेला तर दोन्ही डावात दोन आकडी संख्याही ओलांडता आली नाही. कुलदीप यादवला संघाबाहेर ठेवण्याची चूक विराट कोहलीला महागात पडली. विराट कोहलीनं कुलदीपऐवजी शाबाज नदीमला संघात स्थान दिलं. मात्र, नदीमला आपली कामगिरी उंचावता आली नाही.

अपराजित राहण्याची मालिका खंडीत

चेन्नईच्या एम. ए चिदंबरम स्टेडियमवर भारतीय संघाला तब्बल २२ वर्षांनंतर पराभव पत्करावा लागला आहे. गेल्या २२ वर्षात भारतीय संघाला चेन्नईमध्ये कसोटी सामन्यात एकही पराभव पत्करावा लागला नव्हता. भारताला यापूर्वी चेन्नईमध्ये १९९९ साली पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर भारतीय संघ चेन्नईमध्ये अपराजित राहिला होता. पण या पराभवानंतर भारताची ही विजयी मालिका खंडीत झाल्याचे पाहायला मिळत आहे.