IND vs AUS : भारत-ऑस्ट्रेलिया दुसरा सामना उद्या, कुणाचे पारडे जड?

Ind vs Aus
Ind vs Aus

नागपूर | Nagpur

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील ३ सामन्यांच्या टी २० मालिकेतील (T20 Series ) दुसरा सामना उद्या शुक्रवारी नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन क्रिकेट मैदानावर खेळवण्यात येणार आहे. ऑस्ट्रेलिया संघाने मोहाली येथील सलामी सामना ४ विकेट्सने जिंकून मालिकेत १-० अशी विजयी आघाडी घेतली आहे...

उद्याच्या सामन्यात विजय मिळवून मालिका विजय संपादन करण्यासाठी ऑस्ट्रेलिया (Australia) मैदानात उतरणार आहे. दोन्ही संघांना उद्याचा सामन्यात विजय अनिवार्य असणार आहे. सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स आणि हॉटस्टार वाहिनीवर सायंकाळी ६:५० ला करण्यात येणार आहे.

भारताच्या उपराजधानीत तब्बल ३ वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर सामना खेळवण्यात येणार आहे. मात्र सामना प्रत्यक्षात पाहण्यासाठी मैदानात येणाऱ्या क्रिकेटप्रेमींसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे.

उद्याच्या सामन्याचा दिवशी सामन्यावर जोरदार पाऊस (Rain) पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे क्रिकेट प्रेमींच्या उत्साहावर विरजण पडण्याची शक्यता आहे. याशिवाय या सामन्यातून भारतीय संघाचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) संघात पुनरागमन करणार असल्याचे स्पष्ट संकेत भारतीय कर्णधार रोहित शर्माने दिले आहेत.

सलामी टी २० सामन्यात अपयशी ठरलेल्या रोहित शर्मा , विराट कोहली यांना मोठी खेळी साकारण्याची संधी आहे. तर भारतीय संघासाठी दिलासादायक बाब म्हणजे लोकेश राहुल , हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादव यांनी पहिल्या सामन्यात महत्वपूर्ण खेळी साकारून भारतीय संघाला २० षटकात २०० धावांचा पल्ला गाठून दिला होता.

मात्र भारतीय गोलंदाजांनी केलेली सुमार गोलंदाजी आणि ढिसाळ क्षेत्ररक्षण यामुळे भारतीय संघाला पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. आता पहिल्या सामन्यातील झालेल्या चुकांमधून धडा घेऊन नव्या उमेदीने रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि कंपनी मैदानात उतरणार आहे.

Ind vs Aus
रुपयाची इतिहासातील सर्वात मोठी घसरण

शिवाय पहिल्या टी २० सामन्यात भारताला विजयापासून वंचित ठेवण्यात महत्वपूर्ण भूमिका असलेल्या कॅमरुन ग्रीन आणि मॅथ्यू वेड यांच्यापासून भारतीय संघाला सावध राहावं लागणार आहे.

Ind vs Aus
झाडावर झुंज करणारे बिबटे आता पोहोचले छतावर

भारतीय संघ नागपूरच्या मैदानात पाचवा टी २० सामना खेळणार आहे. भारताने अखेरचा सामना २०१९ मध्ये बांगलादेशविरुद्ध खेळाला होता. टी २० सामन्यांमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया २३ वेळा एकमेकांविरुद्ध भिडले आहेत यात भारताने १३ तर ऑस्ट्रेलियाने १० विजय संपादन केले आहेत.

Ind vs Aus
महिला आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा

उद्याच्या सामन्यात रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, कॅमेरून ग्रीन आणि ग्लेन मॅक्सवेल हे टॉप परफॉर्मर्स असतील.

सलिल परांजपे, नाशिक.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com