IND vs AUS : भारताला विजयासाठी ३७५ धावांची गरज

कर्णधार आरोन फिंच आणि स्टीव्ह स्मिथ यांची शतकी खेळी
IND vs AUS : भारताला विजयासाठी ३७५ धावांची गरज

मुंबई | Mumbai

कर्णधार आरोन फिंच आणि स्टीव्ह स्मिथच्या वादळी शतकांमुळे ऑस्ट्रेलियाने भारतासमोर ५० षटकांत ६ बाद ३७४ धावांचा डोंगर उभारला आहे. भारताला विजयासाठी ३७५ धावांची गरज आहे.

भारताविरुद्धच्या पहिल्या वनडेत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार फिंचने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाज करण्याचा निर्णय घेतला. डेव्हिड वॉर्नर आणि एरॉन फिंच यांनी ऑस्ट्रेलियाच्या डावाची सुरूवात केली. या दोघांनी पहिल्या ओव्हरपासून भारतीय गोलंदाजांवर वचर्स्व ठेवले. दोघांनी पहिल्या विकटेसाठी १५६ धावांची भागिदारी केली. मोहम्मद शमीने वॉर्नरची विकेट घेतली. शमीच्या चेंडूवर वॉर्नरने मारलेला चेंडू विकेटकीपर केएल राहुलच्या हातात गेला. अंपायरने नाबाद दिल्यानंतर विराट कोहलीने DRS घेतला. त्यावर भारताला पहिले यश मिळाले. वॉर्नरने ७६ चेंडूत ६९ धावा केल्या. त्यानंतर आलेल्या स्टिव्ह स्मिथने टी-२० स्टाईलने फलंदाजी सुरू केली. त्याने फक्त ३६ चेंडूत ५० धावा केल्या. दुसऱ्या बाजूला कर्णधार फिंचने भारताविरुद्धचे चौथे शतक ११७ चेंडूत पूर्ण केले. शतक झाल्यानंतर तो ११४ धावांवर बाद झाला. त्याला जसप्रीत बुमराहने बाद केले. त्यानंतर युजवेंद्र चहलने मार्कस स्टायोनिसला पहिल्याच चेंडूवर शून्यावर बाद करून माघारी पाठवले. स्टायोनिसच्या जागेवर आलेल्या ग्लेन मॅक्सवेलने पहिल्या चेंडूपासून भारतीय गोलंदाजांची धुलाई सुरू केली. त्याने १९ चेंडूत ३ षटकार आणि ५ चौकारांसह ४५ धावा केल्या. त्यानंतर नवदीप सैनीने मार्नस लाबुशानेला ३ धावांवर बाद करत ऑस्ट्रेलिची पाचवी विकेट घेतली. मधळ्या फळीतील दोन फलंदाज झटपट बाद झाले तरी स्टीव्ह स्मिथने एकाबाजूने धावांचा वेग सुरू ठेवला होता. त्याने फक्त ६२ चेंडूत शतक केले. अखेरच्या षटकात मोहम्मद शमीने त्याची बोल्ड घेतली. स्मिथने ६३ चेंडूत १०१ धावा केल्या.

स्मिथचे कारकिर्दीतील सर्वात वेगवान शतक

स्मिथनं पहिल्या एकदिवसीय सामन्यात ६६ चेंडूत चार षटकार आणि ११ चौकाऱ्यांच्या मदतीनं १०५ धावांची खेळी कली. स्मिथनं ऑस्ट्रेलियाकडून एकदिवसीय सामन्यात तिसरं वेगवान शतक झळकावलं आहे. ऑस्ट्रेलियाकडून मॅक्सवेलनं सर्वात वेगवान शतक झळकावलं आहे. मॅक्सवेलनं फक् ५१ चेंडूत शतकी खेळी केली होती. दुसऱ्या क्रमांकावर जेम्स फॉक्नर आहे. फॉकनरनं ५७ चेंडूत शतकी खेळी केली होती. स्मिथनं ६२ चेंडूत शतक झळकावलं आहे. स्मिथच्या एकदिवसीय करिअरमधील हे सर्वात वेगवान शतक आहे. स्मिथशिवाय पहिल्या एकदिवसीय सामन्यात कर्णधार फिंचने एकदविसीय करिअरमधील १७ वे शतक झळकावत ११४ धावांची खेळी केली. तर वॉर्नरनं ६९ धावांची अर्धशतकी खेळी केली. मॅक्सवेलनं १९ चेंडूत झटपट ४५ धावा चोपल्या. यामध्ये पाच चौकार आणि पाच षटकारांचा समावेश आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com