IND VS AUS : जडेजा-अश्विनची दमदार कामगिरी; भारताला विजयासाठी ११५ धावांचे आव्हान

IND VS AUS : जडेजा-अश्विनची दमदार कामगिरी; भारताला विजयासाठी ११५ धावांचे आव्हान

नवी दिल्ली | New Delhi

भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया (India vs Australia) या संघामध्ये ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना सध्या दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडियमवर (Arun Jaitley Stadium) सुरू आहे. या कसोटीत प्रथम फलंदाजी करतांना ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात २६३ धावा केल्या.

त्याला प्रत्युत्तर देताना भारताला फक्त २६२ धावा करता आल्या. विराट कोहली आणि अक्षर पटेलच्या दमदार खेळीमुळे भारताला हा टप्पा गाठता आला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात भारताच्या फिरकीसमोर कांगारूंनी नांग्या टाकल्याचे पहायला मिळाले.

दिल्ली स्टेडियमध्ये (Delhi Stadium) टीम इंडियासमोर (India) विजयासाठी ११५ धावांचे लक्ष्य आहे. अश्विन आणि जाडेजाच्या फिरकीसमोर ऑस्ट्रेलियाचा (Australia) दुसरा डाव ११३ धावांवर आटोपला. अश्विनने ३ तर जडेजाने ७ विकेट्स काढल्या. भारतीय फलंदाजासमोर दुसरी टेस्ट जिंकण्याचे आव्हान आहे. पहिल्या डावात भारतीय फलंदाज ऑस्ट्रेलियाच्या फिरकीसमोर खेळपट्टीवर टीकू शकले नव्हते. त्यानंतर २६२ धावांवर भारताचा पहिला डाव आटोपला होता.

तसेच या सामन्यासाठी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाने पहिल्या डावात २६३ धावा केल्या होत्या. मात्र दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना सुर गवसला नसल्याने त्यांचा डाव  ११३ धावांवर आटोपला आहे. त्यामुळे भारताला विजयासाठी ११५ धावांची आवश्यकता आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

ऑस्ट्रेलियाकडून ट्रेविस हेडने सर्वाधिक ४३ धावांची खेळी केली. मार्नस लाबूशेनने ३५ धावांचे योगदान दिले. याशिवाय इतर कुठल्याही फलंदाजाला हवी तशी कामगिरी करता आली नाही. यावेळी भारतीय संघातील फिरकी गोलंदाजांसमोर ऑस्ट्रेलियाचे फलंदाज हताश होताना दिसून आले.

IND VS AUS : जडेजा-अश्विनची दमदार कामगिरी; भारताला विजयासाठी ११५ धावांचे आव्हान
अमित शहांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात; म्हणाले, मुख्यमंत्रीपदासाठी...

दरम्यान, दुसऱ्या डावात अश्विन आणि जडेजाची जोडी ऑस्ट्रेलियावर भारी पडली. रवींद्र जडेजाने ४२ धावा खर्च करत ७ तर आर अश्विनने ५९ धावा खर्च करत ३ गडी बाद केले. या सामन्यातील पहिल्या डावात आर अश्विनने (R Ashwin) ३ तर जडेजाने (Jadeja) सुद्धा ३ गडी बाद केले होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com