
नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघांमध्ये सुरु असलेल्या ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील नागपूर येथील सलामी लढतीत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने पाहुण्या ऑस्ट्रेलिया संघावर १ डाव आणि १३२ धावांनी दणदणीत विजय संपादन केला. भारतीय संघाने चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.
आजपासून दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. भारतीय क्रिकेटपटू चेतेश्वर पुजारा आपला १०० वा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला आहे. १०० वा सामना खेळणारा तो १३ वा भारतीय फलंदाज ठरला आहे.
भारतीय संघासाठी सर्वाधिक कसोटी सामने खेळण्याचा विक्रम सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांच्या नावे आहे. सचिनने एकूण २०० कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले होते. चेतेश्वर पुजाराने (cheteshwar pujara) २०१० मध्ये भारतीय संघासाठी पदार्पण केले होते.
भारतीय संघासाठी सर्वाधिक कसोटी सामने खेळणारे खेळाडू पुढील प्रमाणे
१) सचिन तेंडुलकर-२०० सामने
२) राहुल द्रविड़- १६३ सामने
३) वीवीएस लक्ष्मण- १३२ सामने
४) अनिल कुंबळे -१३२ सामने
५) कपिल देव- १३१ सामने
६) सुनील गावसकर -१२५ सामने
७) दिलीप वेंगसरकर- ११६ सामने
८) सौरव गांगुली- ११३ सामने
९) विराट कोहली- १०६ सामने
१०) इशांत शर्मा- १०५ सामने
११) हरभजन सिंग - १०३ सामने
१२) वीरेंद्र सेहवाग- १०३ सामने
१३) चेतेश्वर पुजारा- १०० सामने*