आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्याचा निर्णय लवकरच

२९ मे ला बीसीसीआयची महत्वपूर्ण बैठक
आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्याचा निर्णय लवकरच

मुंबई | Mumbai

भारतात करोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेनं अक्षरशः धुमाकूळ घातला आहे, याचा परिणाम आयपीएलच्या १४ व्या हंगामातही मोठ्या प्रकर्षाने झाल्याचे दिसून आले. आयपीएलचा पहिला टप्पा भारतामध्ये मोठ्या थाटात पार पडला.

मात्र दुसरा महत्वपूर्ण टप्पा सुरु होण्याआधी करोनाने आयपीएलच्या बायोबबलमध्ये शिरकाव केल्यामुळे स्पर्धेतील अनेक खेळाडू करोना संक्रमित आढळून आले. त्यामुळे बीसीसीआयने तातडीने स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला.

आयपीएलचे दुसऱ्या टप्प्यातील एकूण ३१ सामने शिल्लक आहेत. शिवाय यंदाच्या ऑक्टोबर - नोव्हेंबर महिन्यात भारतात टी २० विश्वचषकाचं आयोजन करण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर येत्या २९ मे रोजी बीसीसीआयने एक महत्वाची बैठक आयोजित केली आहे.

विश्वचषकाच्या आयोजनासाठी बीसीसीआयने प्लॅन बी म्हणून संयुक्त अरब अमिराती हा पर्याय समोर ठेवला आहे.

जुलैमध्ये भारतामध्ये कोरोना परिस्थिती कशी असणार आहे. यावर बीसीसीआय विश्वचषकाचं आयोजन भारतात करायचं की , संपूर्ण स्पर्धेचं आयोजन यूएईत करायचं यासंदर्भात आपला निर्णय घेणार आहे. कारण सध्याच्या घडीला स्पर्धा भारतातच खेळवण्याचा बीसीसीआयचा विचार सुरु आहे. कारण यंदाच्या विश्वचषकाचं आयोजन भारतामध्ये करण्यात येणार आहे.

भारतामध्ये नोव्हेंबरमध्ये करोना विषाणूच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. नोव्हेंबरमध्ये भारतात परिस्थिती योग्य नियंत्रणात असल्यास स्पर्धेचं आयोजन भारतामध्ये करण्यात येणार आहे. यासंदर्भात बीसीसीआय आपला अंतिम निर्णय जून महिनाअखेरीस जाहीर करण्याची शक्यता आहे. अशी बीसीसीआय सूत्रांनी स्पष्ट केली आहे .

या बैठकीत आयपीएल १४ मधील उर्वरीत ३१ सामन्यांसंदर्भात चर्चा केली जाणार आहे. भारतीय संघाला पुढील महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जायचे आहे. भारतीय संघाला सप्टेंबर महिन्यापर्यंत ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. त्यामुळे आयपीएलच्या उर्वरीत सामन्यांसाठी लंडन या पर्यायाचा विचार सुरु आहे.

इंग्लिश कौंटी क्लबने आयपीएल सामन्याच्या आयोजनासाठी प्रस्ताव बीसीसीआयसमोर ठेवला आहे. त्याला इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डानं आपला पाठिंबा दर्शवला आहे.

त्या पार्श्वभूमीवर भारत आणि इंग्लंड यांच्या मालिकेतील एक सामना कमी खेळवण्याचा विचार सुरु आहे. शिवाय लंडनमध्ये आयपीएलच्या उर्वरीत सामन्यांचे आयोजन करणे योग्य आहे. कारण भारत आणि इंग्लंड संघातील आयपीएलमध्ये सहभागी होणारे बहुतांश खेळाडू या मालिकेत सहभागी होणार आहेत.

- सलिल परांजपे, नाशिक

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com