ICC World Cup : कुलदीपचा बॉल ऑफ टुर्नामेंट

ICC World Cup : कुलदीपचा बॉल ऑफ टुर्नामेंट

लेफ्ट आर्म स्पीनर कुलदीप यादव अंपायरच्या उजव्या बाजूने गोलंदाजीला आला...इंग्लंडचा ज्योस बटलर त्याला तोंड देण्यासाठी सज्ज झाला...कुलदीपने छोटासा रनअप घेतला व चेंडू फेकला...ऑफ स्टंपबाहेर पीच होऊ पाहत असलेला तो चेंडू टप्पा पडू द्यावा व मग पॉईंटकडे मारावा असा विचार बहुदा बटलरचा सुरू असावा...पण किमया झाली...

चेंडू खेळपट्टीवर पडला व अचानक 7 अंश कोनातून फिरून स्टंपच्या दिशेने गेला...ते पाहून बटलर बँकफूटवर जाण्याच्या प्रयत्नात असेपर्यंत चेंडू ऑफ व मिडल स्टंपवर आदळला होता व स्टंपचे लाईट चमकून त्यावरील बेल्सही उडाल्या होत्या...कुलदीपच्या बोटांची ती जादूई किमया पाहून बटलरही क्षणभर अवाक झाला...दुसरीकडे कुलदीपने एक बोट उंचावत केलेला जल्लोष व त्याला भारतीय संघातील सहकारी खेळाडूंनी मारलेली मिठी स्टेडियममधील जल्लोष वाढवून गेली. कुलदीपचा तो चेंडू बॉल ऑफ टुर्नामेंट ठरण्याची चिन्हे आहेत.

विश्वचषकातील इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात त्याने बटलरला ज्या चेंडूवर बाद केले त्याचा व्हिडिओ भन्नाट व्हायरल झाला आहे. हा चेंडू त्याचा स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट चेंडू आणि सर्वोत्तम विकेटही होता. कुलदीपने प्रत्येक सामन्यात शानदार गोलंदाजीने विकेट्स मिळवल्या आहेत, जी खरोखरच एक चांगली गोष्ट आहे. पण बटलरची झोप उडवणारा हा चेंडू कुलदीपचा बॉल ऑफ द टूर्नामेंट आहे.

इंग्लंडच्या डावातील 16 वे षटक टाकण्यासाठी आलेल्या कुलदीप यादवने पहिल्याच चेंडूवर बटलरला क्लीन बोल्ड केले. ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलेला हा चेंडू खेळपट्टीवर आदळल्यानंतर थेट स्टंपमध्ये गेला. कुलदीपच्या या अप्रतिम बोल्ड मूव्हचा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे. ज्या चेंडूवर बटलर आऊट झाला तो चेंडू 7.2 अंश कोनातून फिरला. इंग्लिश कर्णधाराला काही समजण्याआधीच तो क्लीन बोल्ड झाला होता.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com