
मुंबई | Mumbai
भारत आणि पाकिस्तान (INDvsPAK ) यांच्यामधला क्रिकेटचा सामना म्हणजे तिसरं युद्धचं. आता हे युद्ध उद्या पाहण्याचा योग क्रिकेट चाहत्यांना लाभणार आहे. कारण आता भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामन्यात थरार रंगणार आहे.
उद्या (६ मार्च) भारतीय क्रिकेट संघ महिला क्रिकेट विश्वचषक २०२२ (ICC Womens Cricket World Cup 2022) मधील पहिला सामना खेळणार आहे. भारताचा सलामीचा सामना कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानशी होणार आहे. ४ मार्च पासून महिला क्रिकेट विश्वचषक २०२२ स्पर्धेची सुरुवात झाली आहे. यंदाच्या वर्षी या स्पर्धेचं आयोजन न्यूझीलंडमध्ये करण्यात आले आहे.
भारतीय महिला संघाचे विश्वचषकातील वेळापत्रक
६ मार्च - वि. पाकिस्तान
१० मार्च - वि. न्यूझीलंड
१२ मार्च - वि. वेस्ट इंडिज
१६ मार्च - वि. इंग्लंड
१९ मार्च - वि. ऑस्ट्रेलिया
२२ मार्च - वि. बांगलादेश
२७ मार्च - वि. दक्षिण आफ्रिका
भारतीय संघ
मिताली राज ( कर्णधार), हरमनप्रीत कौर ( उप कर्णधार) , स्मृती मानधना, शेफाली वर्मा, यास्तिका भाटीया, दीप्ती शर्मा, रिचा घोष ( यष्टिरक्षक), स्नेह राणा, झुलन गोस्वामी, पूजा वस्त्राकर, मेघना सिंग, रेणुका सिंग ठाकूर, तानिया भाटीया ( यष्टिरक्षक), राजेश्वरी गायकवाड, पूनम यादव