आयसीसी टी २० वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर; 'या' दिवशी रंगणार 'हाय व्होल्टेज' सामना

आयसीसी टी २० वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर; 'या' दिवशी रंगणार 'हाय व्होल्टेज' सामना

मुंबई | Mumbai

ऑस्ट्रेलियामध्ये (Australia) येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या आयसीसी टी २० वर्ल्डकपचे वेळापत्रक (ICC T20 World Cup Schedule) आयसीसीने (ICC) जाहीर केले आहे...

दि. १६ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर या कालावधीत आयसीसी टी २० वर्ल्डकपचा आठवा हंगाम खेळवण्यात येणार आहे. आयसीसीने मुख्य स्पर्धेसाठी गटवारी जाहीर केली आहे

भारताचा (India) समावेश ग्रुप २ मध्ये करण्यात आला आहे. या गटात पाकिस्तान (Pakistan), दक्षिण आफ्रिका (South Africa), बांगलादेश (Bangladesh), भारत (India) हे संघ आहेत. तर पहिल्या गटात ऑस्ट्रेलिया (Australia), न्यूझीलंड (New Zealand), इंग्लंड (England), अफगाणिस्तान (Afghanistan) संघ सहभागी आहेत.

मुख्य फेरीपूर्वी पात्रता फेरीची गटवारी पहिल्या गटात श्रीलंका (Sri Lanka), नामिबिया (Namibia), क्वालिफायर १, क्वालिफायर २, दुसऱ्या गटात विंडीज (West Indies), स्कॉटलंड (Scotland), क्वालिफायर ३ आणि क्वालिफायर ४ संघ असतील.

आयसीसी टी २० वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर; 'या' दिवशी रंगणार 'हाय व्होल्टेज' सामना
Visual Story : अबब! 'पुष्पा'च्या आयटम साँगसाठी समांथाने आकारले पाच कोटी

भारताचे सामने

१६ ऑक्टोबरपासून पात्रता फेरीला सुरुवात होईल. तर भारताचा पहिला सामना २३ ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध मेलबर्न क्रिकेट मैदानावर रंगेल. संपूर्ण स्पर्धेत भारत ५ सामने खेळणार आहे. दुसरा सामना अ गटातील उपविजेत्या संघासह तिसरा सामना दक्षिण आफ्रिकेसह चौथा सामना बांगलादेशविरुद्ध आणि अखेरचा साखळी सामना गट ब मधील विजेत्यासह रंगेल. २३ ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध सामन्यानंतर भारताचे उर्वरीत सामने २७ ऑक्टोबर , ३० ऑक्टोबर २ नोव्हेंबर आणि ६ नोव्हेंबर रोजी होतील.

आयसीसी टी २० वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर; 'या' दिवशी रंगणार 'हाय व्होल्टेज' सामना
आता व्हॉट्सअ‍ॅपवरच करता येणार फोटो, व्हिडीओ एडीट; 'अशी' आहेत वैशिष्ट्ये

भारतीय संघाचे नेतृत्व रोहित शर्मा (Rohit Sharma) करणार आहे. हे सर्व सामने अनुक्रमे जिलोन्ग, एडिलेड, ब्रिस्बेन, मेलबर्न, पर्थ आणि सिडनी येथे होतील. अंतिम सामना १३ नोव्हेंबरला मेलबर्न तर उपांत्य सामने ९ ,१० नोव्हेंबरला सिडनी येथे होतील.

आयसीसी टी २० वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर; 'या' दिवशी रंगणार 'हाय व्होल्टेज' सामना
व्हॉट्सअ‍ॅपवर मिळवा लसीचे प्रमाणपत्र; 'असे' करा डाउनलोड

त्याचबरोबर वर्ल्डकप सामन्यांची तिकीटविक्री ७ फेब्रुवारीपासून सुरु होईल. मात्र या काळात करोनाच्या (Corona) सर्व नियमांचे पालन करावे लागणार आहे. २००७ साली धोनीच्या नेतृत्वात भारताने वर्ल्डकपवर आपले नावं कोरले होते.

सलिल परांजपे, नाशिक.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com