ICC T20 World Cup : न्यूझीलंड-पाकिस्तान आज भिडणार; कुणाला मिळणार फायनलचे तिकीट?

ICC T20 World Cup : न्यूझीलंड-पाकिस्तान आज भिडणार; कुणाला मिळणार फायनलचे  तिकीट?

मुंबई | Mumbai

आयसीसी टी २० वर्ल्डकपमधील (ICC T20 World Cup) पहिला सेमीफायनल सामना सिडनी (Sydney) येथे न्यूझीलंड आणि पाकिस्तान (New Zealand vs Pakistan) यांच्यात होणार आहे. हा सामना दुपारी १:३० वाजता सुरु होईल...

सलामीच्या २ सामन्यांमध्ये अनपेक्षित पराभव स्वीकारल्यानंतर पाकिस्तानने आयसीसी टी २० वर्ल्डकप स्पर्धेत जबरदस्त कमबॅक केले आहे. त्यानंतर आता न्यूझीलंडला पराभूत करून आपली दुसरी अंतिम फेरी गाठण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न असणार आहे

पाकिस्तानकडून शादाब खान, इफतिकार अहमद, शान मसूद, मोहम्मद हॅरिस चांगली कामगिरी करत असून गोलंदाजीत हॅरिस रौफ , शाहीन आफ्रिदी , शादाब खान, चमकत आहेत. त्यांना इतरही गोलंदाज चांगली साथ देत आहेत. तर न्यूझीलंडकडून डेवीन कॉन्व्हे , ग्लेन फिलिप्स , फिन अलेन फॉर्मात आहेत. याशिवाय गोलंदाजीत ट्रेंट बोल्ट, लौकी फर्ग्युसन टीम साऊदी चांगली गोलंदाजी करत आहेत. त्यांना फिरकी गोलंदाज मिचेल सॅन्टेनर, ईश सोढीही चांगली साथ देत आहेत. दोन्ही संघांमध्ये तुलना केल्यास न्यूझीलंडचे पारडे विजयासाठी जड दिसत आहे.

दरम्यान, आतापर्यंत पाकिस्तान आणि न्यूझीलंड २८ वेळा टी २० क्रिकेटमध्ये समोरासमोर आले असून यात पाकिस्तानने १७ तर न्यूझीलंडने ११ विजय साकारले आहेत. तसेच सिडनीची खेळपट्टी दोन्ही संघातील फलंदाजाना अनुकूल असून येथे धावांचा पाऊस (Rain of runs) पडण्याची शक्यता आहे.

सलिल परांजपे, नाशिक

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com