ICC T20 World Cup : ऑस्ट्रेलिया-श्रीलंका आज भिडणार, कुणाचे पारडे जड?

ICC T20 World Cup : ऑस्ट्रेलिया-श्रीलंका आज भिडणार, कुणाचे पारडे जड?

पर्थ | Parth

आयसीसी टी २० वर्ल्डकप (ICC T20 World Cup) क्रिकेट स्पर्धेत आज सातवा सामना सुपर १२ मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका (Aus vs SL) संघात होणार आहे. सुपर १२ मध्ये हा सातवा सामना असणार आहे...

श्रीलंका संघाने आपल्या सलामी सामन्यात आयर्लंड संघावर ९ गडी राखून दणदणीत विजय साकारून विजयी सलामी दिली आहे. आता ऑस्ट्रेलिया संघावर विजय नोंदवून स्पर्धेतील आपला दुसरा विजय संपादन करण्यासाठी श्रीलंका सज्ज असणार आहे.

तर दुसरीकडे ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात सुपर १२ मध्ये झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता. आता श्रीलंकेवर मात करून पहिल्या विजय साकारण्यासाठी ऑस्ट्रेलिया सज्ज असणार आहे.

सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स आणि हॉटस्टार वाहिनीवर सायंकाळी ४:३० वाजता भारतीय वेळेनुसार करण्यात येणार आहे. आजच्या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने विजय मिळवला तर सुपर १२ शर्यतीत आपलं आव्हान कायम राखण्यासाठी उत्सुक आहे. आजच्या सामन्यात ऑस्ट्रेलिया पराभूत झाल्यास त्यांचं स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात येणार आहे.

आता ऑस्ट्रेलिया संघाला आपल्या उर्वरीत ४ सामन्यात इंग्लंड , अफगाणिस्तान , आयर्लंड आणि श्रीलंका संघाचा सामना करायचा आहे. शिवाय ऑस्ट्रेलिया संघाची धावगती इतर संघांच्या तुलनेत अतिशय खराब आहे बाद फेरीच्या शर्यतीत आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी ऑस्ट्रेलिया संघाला सर्व सामने मोठया फरकाने जिंकावे लागणार आहेत.

आजच्या सामन्यात दसून शनाका, डेविड वॉर्नर, एरन फिंच, ग्लेन मॅक्सवेल हे स्टार प्लेअर्स असतील.

सलिल परांजपे, नाशिक.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com