ICC T20 World Cup 2022, SA vs PAK : दक्षिण आफ्रिका बाद फेरी निश्चित करणार?

ICC T20 World Cup 2022, SA vs PAK : दक्षिण आफ्रिका बाद फेरी निश्चित करणार?

सिडनी | Sydney

आयसीसी टी २० वर्ल्डकप (ICC T20 World Cup) क्रिकेट स्पर्धेत आज गुरुवारी दक्षिण आफ्रिका (South Africa) विरुद्ध पाकिस्तान (Pakistan) यांच्यात महत्वपूर्ण सामना सिडनीच्या एससीजी क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे...

या सामन्यातून वेगवान गोलंदाजांमधील चढाओढ पाहायला मिळणार आहे. भारतीय संघाने (India) एडिलेड येथे झालेल्या दुसऱ्या सामन्यात बांगलादेश (Bangladesh) संघावर डकवर्थ लुईस नियमाने विजय संपादन करून ४ सामन्यांमध्ये १ पराभव आणि ३ विजयांसह ६ गुणांची कमाई करत अव्वल स्थानी धडक मारली आहे. आता पाकिस्तान (Pakistan) संघाला बाद फेरीच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी आज विजय आवश्यक असणार आहे.

दक्षिण आफ्रिका आपली विजयी मोहीम कायम ठेवून अव्वल स्थान काबीज करून उपांत्य फेरीतील आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी सज्ज असणार आहे. ब गटातून दुसऱ्या स्थानासाठी दक्षिण आफ्रिका संघाला प्रबळ दावेदार मानलं जात आहे. त्यांना फक्त १ विजय पुरेसा आहे.

दक्षिण आफ्रिका संघाचा शेवटचा सामना रविवारी नेदरलॅंड्स संघाशी होणार आहे. पण दक्षिण आफ्रिकेला पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात आपलं सर्वस्व पणाला लावून खेळ करावा लागणार आहे. याची संपूर्ण जवाबदारी लुंगी एनगिडी, एन्रिक नॉरकिया, रबाडा आणि वेन पार्नेल यांच्यावर असणार आहे.

ICC T20 World Cup 2022, SA vs PAK : दक्षिण आफ्रिका बाद फेरी निश्चित करणार?
Video : धकाधकीच्या जीवनात शांतता पाहिजे? सुरगाण्यातील 'या' ठिकाणी एकदा भेट द्याच

आजच्या सामन्यात रायली रुसो, क्विंटन डिकॉक, एडन मार्करम या सर्व फलंदाजांना आपल्या कामगिरीत सातत्य राखावं लागणार आहे. दुसरीकडे पाकिस्तान संघासाठी शाहीन शाह आफ्रिदी, हरीस रौफ, नसीम शाह या तेज गोलंदाजाना साथ देण्यासाठी शादाब खान आणि मोहंमद नवाझ आपल्या फिरकीच्या जादूने दक्षिण आफ्रिकेवर दडपण टाकण्यासाठी सज्ज असणार आहे.

ICC T20 World Cup 2022, SA vs PAK : दक्षिण आफ्रिका बाद फेरी निश्चित करणार?
शिंदे सरकारचा मविआला पुन्हा दणका; 'त्या' प्रकरणांची सीबीआयमार्फत चौकशी

तसेच बाबर आझम आणि मोहंमद रिझवान यांच्यावर संघाला चांगली सुरुवात मिळवून देण्याची जवाबदारी असणार आहे. आजच्या सामन्यात क्विंटन डिकॉक , रायली रुसो , मार्करम , रिझवान हे स्टार प्लेअर्स असतील भारतीय वेळेनुसार दुपारी १:३० वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे.

सलिल परांजपे, नाशिक.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com