ICC T20 World Cup 2022 : भारतासमोर नेदरलॅंड्सचे आव्हान; कोण मारणार बाजी?

ICC T20 World Cup 2022 : भारतासमोर नेदरलॅंड्सचे आव्हान; कोण मारणार बाजी?

सिडनी | Sydney

आयसीसी टी २० वर्ल्डकप (ICC T20 World Cup) क्रिकेट स्पर्धेत सुपर १२ लढतीमध्ये आपल्या सलामी सामन्यात पारंपारिक कट्टर प्रतिस्स्पर्धी पाकिस्तान संघाला चारीमुंड्या चीत करून प्रचंड आत्मविश्वास मिळवून फॉर्मात असलेली रोहित शर्माची टीम इंडिया सीडनीच्या एससीजी क्रिकेट स्टेडियमवर उद्या नेदरलँड्स संघाचा सामना करण्यासाठी मैदानात उतरणार आहे...

बाद फेरीच्या शर्यतीत आपलं स्थान अधिक मजबूत करण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. विशेष म्हणजे भारत आणि नेदरलँड्स प्रथमच टी २० सामना खेळणार आहे. तसेच या सामन्यात भारतीय संघ आपल्या प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्याची शक्यता आहे.

या सामन्यात अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकऐवजी रिषभ पंतला अंतिम ११ मध्ये स्थान मिळू शकते. याशिवाय अक्षर पटेलच्या बदली दीपक हुडाला संधी मिळण्याची शक्यता आहे. स्कॉट एडवर्ड्स कर्णधारपद भूषवत असलेला नेदरलॅंड्स भारतीय संघाला पराभूत करून विजयी सलामीसाठी प्रयंत्न करणार आहे.

पात्रता फेरीत ३ पैकी २ सामन्यांमध्ये विजय संपादन करून सुपर १२ मध्ये दणक्यात प्रवेश करणाऱ्या नेदरलॅंड्स संघाला सलामी सामन्यात बांगलादेश संघाने ९ धावांनी पराभूत करून विजयी सलामी दिली होती.

आता हा पराभव मागे सारून नव्या उमेदीने मैदानात उतरण्यासाठी हॉलंड सज्ज आहे. पाकिस्तानविरुद्ध सलामी सामन्यात लोकेश राहुल रोहित शर्मा , सूर्यकुमार यादव अपयशी ठरले होते. उद्या होणाऱ्या सामन्यात मोठी खेळी साकारण्यासाठी तिन्ही फलंदाज उत्सुक आहेत.

बांगलादेश संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात कॉलिन एकपमॅन वगळता एकही फलंदाज आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरले होते. त्यांच्याकडून चांगली कामगिरी संघाला अपेक्षित आहे. पण असं असलं तरी भारतीय संघाला नेदरलॅंड्स संघाविरुद्ध सावधगिरी बाळगण्याची गरज असणार आहे. आजच्या सामन्यात स्कॉट एडवर्ट्स, सूर्यकुमार यादव, विराट कोहली हे स्टार प्लेअर्स असतील. सामन्याची वेळ दुपारी १:३० वाजता.

सलिल परांजपे, नाशिक.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com