ICC T20 World Cup 2022 : ऑस्ट्रेलिया-आयर्लंड आज आमनेसामने

ICC T20 World Cup 2022 : ऑस्ट्रेलिया-आयर्लंड आज आमनेसामने

ब्रिबेन :

आयसीसी टी २० वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेत आज सोमवारी आयर्लंड संघासमोर बलाढ्य ऑस्ट्रेलिया संघाचं आव्हान असणार आहे. आयसीसी टी २० वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेत उपांत्य फेरीच्या शर्यतीत आपलं स्थान टिकवून ठेवण्यासाठी दोन्ही संघ आज मैदानात उतरणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी दीड वाजता ब्रिस्बेनच्या गॅबा मैदानावर खेळवण्यात येणार आहे.

ऑस्ट्रेलिया संघाचं नेतृत्व एरन फिंचकडे असणार आहे. तर आयर्लंड संघाचं कर्णधारपद अँडी बेलबर्नीकडे असणार आहे . आयसीसी टी २० वर्ल्डकप स्पर्धेच्या सुपर १२ फेरीच्या सामन्यात अ गटात न्यूझीलंड संघाचं उपांत्य फेरीचं तिकीट पक्के मानलं जात आहे.

मात्र दुसऱ्या स्थानासाठी ऑस्ट्रेलिया , इंग्लंड , श्रीलंका , अफगाणिस्तान आणि आयर्लंड शर्यतीत आहेत. त्यामुळे आजच्या सामन्याला क्वार्टर फायनलचं स्वरूप प्राप्त झालं आहे. आजच्या सामन्यात विजय संपादन करणाऱ्या संघाला बाद फेरीच्या शर्यतीत आपलं आव्हान कायम राखण्याची संधी असणार आहे. तर पराभूत संघाचं आव्हान संपुष्टात येणार आहे. ऑस्ट्रेलिया संघाला सलामी सामन्यात न्यूझीलंड संघाने ८८ धावांनी पराभूत करून शानदार सुरुवात केली होती.

मात्र दुसऱ्या सामन्यात यजमान ऑस्ट्रेलिया संघाने श्रीलंकेला पराभूत करून आपला पहिला विजय साकारला होता. त्यानंतर इंग्लंडविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला होता. तर दुसरीकडे श्रीलंकेकडून सलामी सामन्यात पराभव स्वीकारल्यानंतर आयर्लंड संघाने डकवर्थ लुईस नियमानुसार इंग्लंड संघावर ५ धावांनी विजय नोंदवून विजयी सलामी दिली होती. तर अफगाणिस्तानविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाल्यामुळे दोन्ही संघाना १-१ गुण बहाल करण्यात आला होता. मात्र हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज संपूर्ण दिवस पावसाची शक्यता आहे.

सलिल परांजपे नाशिक

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com