ICC T20 World Cup 2022 : ऑस्ट्रेलिया-इंग्लंड आज आमनेसामने

ICC T20 World Cup 2022 : ऑस्ट्रेलिया-इंग्लंड आज आमनेसामने

मेलबर्न | Melbourne

आयसीसी टी २० वर्ल्डकप (ICC T20 World Cup) क्रिकेट स्पर्धेत उद्या इंग्लंड (England) संघासमोर ऑस्ट्रेलिया (Australia) संघाचं आव्हान असणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी १:३० वाजता खेळवण्यात येणार आहे...

सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स आणि हॉटस्टार वाहिनीवर करण्यात येणार आहे. मात्र इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या महत्वपूर्ण लढतीपूर्वी ऑस्ट्रेलिया संघाचा यष्टीरक्षक फलंदाज मॅथ्यू वेडला कोरोनाची लागण झाली आहे. शिवाय जोश इंग्लिश दुखापतीमुळे माघारी परतला आहे. त्यामुळे उद्याच्या सामन्यात यष्टीरक्षणाची जवाबदारी कोणाकडे सोपवली जाणार ? ते पाहणं महत्वाचं असणार आहे.

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघांचे प्रत्येकी २ सामने झाले असून, दोन्ही संघाना १-१ विजय मिळवता आला आहे. इंग्लंड संघाने सलामी सामन्यात अफगाणिस्तान संघावर ५ विकेट्सने विजय मिळवून विजयी सुरुवात केली होती. मात्र आयर्लंड संघाविरुद्ध दुसऱ्या सामन्यात डकवर्थ लुईस नियमाने इंग्लंडला पराभव पत्कारावा लागला होता.

हा सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा असल्यामुळे दोन्ही संघाना बाद फेरीच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी विजय अनिवार्य असणार आहे. आयसीसी टी २० वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या टी २० मालिकेत इंग्लडने ऑस्ट्रेलिया संघाला २-० ने पराभूत केलं होतं.

याचा वचपा काढण्यासाठी ऑस्ट्रेलिया सज्ज असणार आहे श्रीलंकेवरील विजयाने फॉर्मात असलेला ऑस्ट्रेलिया इंग्लंडला नमवून आपला दुसरा विजय साकारण्यासाठी सज्ज आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com