राऊंड द विकेट : जुने खेळाडू, नवे पर्व...

राऊंड द विकेट : जुने खेळाडू, नवे पर्व...

डॉ. अरुण स्वादी

आमचं एक बरं आहे. क्रिकेटमध्ये हरलो की दोन चार दिवसांसाठी हलकल्लोळ माजतो, पण लगेच सारं काही विसरून आम्ही तेवढ्याच आत्मीयतेने पुढच्या मालिकेची वाट पाहत बसतो. स्मशानवैराग्य असेच काही असते. तिकडे न्यूझीलंड-अफगाणिस्तान सामन्यात New Zealand-Afghanistan match आमची आहुती पडत असताना चर्चा चालली होती, आयपीएल मधल्या दोन नवीन संघांची; त्यांनी आमच्या मंडळाला किती पैसे दिले याची! त्यात भर होती प्रत्येक संघ किती खेळाडू रिटेन करणार त्या चर्चेची. त्या नियमांची आणि खेळाडूंची! मला तर वाटायला लागलं आहे, विश्वचषक स्पर्धा ही किरकोळ स्पर्धा आहे.

खरी स्पर्धा म्हणजे आयपीएल! ती स्पर्धा पार पडावी म्हणून आमचे बोर्ड कोणत्याही थराला जाऊ शकते. प्रथम ऑस्ट्रेलिया दौरा, मग इंग्लंड आणि मग किंचित विंडो मिळाल्यावर आयपीएलची सोन्याची अंडी उबवायची संधी त्यांनी सोडली नाही. पुढे वर्ल्डकप खेळताना आमचा जीव शिल्लक राहणार आहे की नाही याची साधी फिकीरही त्यांना नव्हती.

पुढचा वर्ल्डकप वर्षभरातच आहे म्हणे! आशा आहे हे आमच्या बोर्डाच्या स्मरणात आहे. आयपीएलचा पसारा एवढा मोठा आहे, फायदा त्याहून मोठा आहे, विसरले तर आश्चर्य वाटायला नको. त्याची बांधणी आतापासून करायला पाहिजे. ऋतुराज गायकवाड आणि वेंकटेश अय्यरला घेऊन त्यांनी एक पाऊल पुढे टाकले आहे, पण भुवनेश्वर कुमार आणि रविचंद्रन आश्विनला निवडून त्यांनी ते लगेच मागे पण घेतले आहे.

आम्हाला गरज आहे बॅटिंग ऑलराऊंडरची! फिरकीत सध्या फक्त जडेजा आहे आणि मध्यम गतीत हार्दिक पांड्या; ज्याची गोलंदाजी आर्यन खानच्या अटकेइतकी चर्चिली गेली. त्या दृष्टीने निवड समितीने पाऊल उचलल्याचे दिसत नाही.अक्षर पटेल जुनाच आणि दीपक चाहर - तोही जुनाच! दोघे गोलंदाज जास्त आणि फलंदाज कमी; कदाचित असे अष्टपैलू खेळाडू जास्त नसावेत. दोन-दोन टीम पाठवायच्या वल्गना करणार्‍या आमच्या देशाला हार्दिक पांड्याला पर्याय मिळू नये हीच आपली शोकांतिका!

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com