आयसीसी टी-20 क्रमवारीत भारताचा ‘हा’ खेळाडू दुसऱ्या स्थानी

आयसीसी टी-20 क्रमवारीत भारताचा ‘हा’ खेळाडू दुसऱ्या स्थानी

नाशिक | Nashik

भारतीय संघात (Indian team) 'स्काय' या नावाने ओळखला जाणारा मधल्या फळीतील फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याने आयसीसीच्या (ICC) फलंदाजीच्या क्रमवारीत दुसरे स्थान पटकावले आहे. आयसीसीने नुकतीच ही यादी जाहीर केली आहे...

आयसीसीने जाहीर केलेल्या क्रमवारीनुसार, ८१८ रेटिंग गुणांसह पहिल्या क्रमांकावर पाकिस्तानचा कर्णधार (Pakistan Captain) बाबर आझम (Babar Azam) आहे. तर ८१६ गुणांसह सूर्यकुमार यादव दुसऱ्या क्रमांकावर आहे. या दोन्ही खेळाडूंमध्ये केवळ २ गुणांचा फरक आहे. सध्या भारत आणि वेस्टइंडीज यांच्यात टी २० मालिकेचा थरार सुरु असून या मालिकेत सुर्यकुमार यादव चागंल्याच फॉर्ममध्ये आहे.

दरम्यान, गोलंदाजीचा विचार केल्यास भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) आठव्या तर दक्षिण आफ्रिकेचा ( South Africa) फिरकीपटू तबरेझ शम्सी (Tabraiz Shamsi) दुसऱ्या तर ऑस्ट्रेलियाचा (Australia) जॉश हेझलवूड (Josh Hazlewood) पहिल्या क्रमांकावर आहे.

सलिल परांजपे, नाशिक

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com