जागतिक कसोटीसाठी आयसीसीकडून महत्वाचा बदल

जागतिक कसोटीसाठी आयसीसीकडून महत्वाचा बदल

मुंबई | Mumbai

आयसीसीने (ICC) जागतिक कसोटी अजिंक्यपद २०२१-२०२३ (world test championship 2021-23) या नवीन हंगामासाठी गुणपद्धतीत महत्वाचा बदल केला आहे...

शिवाय आयसीसीने २०२१-२०२३ या नवीन हंगामासाठी नवीन वेळापत्रक (New schedule) जाहीर केले आहे. भारत विरुद्ध इंग्लंड (India v England) यांच्यातील ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेला (Test series) ४ ऑगस्टपासून प्रारंभ होणार आहे.

या मालिकेतून आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे दुसरे पर्व सुरु होणार आहे. ऑगस्ट २०२१ ते जून २०२३ या कालावधीमध्ये जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे दुसरे पर्व खेळवण्यात येणार आहे.

या हंगामात भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेत एकूण ५ सामने आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लड (Australia v England) संघांमध्ये येत्या डिसेंबर महिन्यात खेळवण्यात येणाऱ्या ऍशेस मालिकेत (Ashes series) एकूण ५ कसोटी सामने खेळवण्यात येणार आहेत.

ऑस्ट्रेलिया (Australia) क्रिकेट संघाला पुढील वर्षी भारतात (India) चार कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. याव्यतिरिक्त ३ कसोटी सामन्यांच्या एकूण ७ मालिका होणार आहेत. तर २ कसोटी सामन्यांच्या एकूण १३ मालिका खेळवण्यात येणार आहेत.

स्पर्धेचा अंतिम सामना अद्याप कोठे होईल हे अद्याप आयसीसीने जाहीर केलेले नाही. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या पहिल्या सीझनप्रमाणे प्रत्येक संघाला ३ होम आणि ३ अवे अशा ६ मालिका खेळणे बंधनकारक असणार आहे .

इंग्लंड संघाला सर्वाधिक २१ कसोटी सामने खेळायचे आहेत. भारत १९, ऑस्ट्रेलिया १८, दक्षिण आफ्रिका १५ कसोटी सामने खेळणार आहे. न्यूझीलंड, विंडीज, श्रीलंका एकूण १३ कसोटी सामने खेळतील तर पाकिस्तान १४ आणि बांगलादेश १२ कसोटी सामने खेळणार आहे.

अशी आहे गुणविभागणी

प्रत्येक संघाला एकसमान कसोटी सामने खेळता येणार नसल्याने आयसीसीने गुणतालिकेतील चुका टाळण्यासाठी प्रत्येक सामन्याला एकसमान गुण दिले असून प्रत्येक सामन्यात विजय संपादन केल्यास १२ गुण दिले जातील. सामना बरोबरीत सुटला तर ६ गुण आणि अनिर्णित राहिला तर ४ गुण दिले जातील. १२ गुणांना १०० टक्के, ६ गुणांना ५० टक्के तर ४ गुणांना ३३. ३३ टक्के गुण दिले जातील. दोन सामन्यांची मालिका २४ तर ३ सामन्यांची मालिका ३६, ४ सामन्यांची मालिका ४८ ,५ सामन्यांची मालिका ६० गुणांची असेल.

सलिल परांजपे, नाशिक.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com