भारतात होणार्‍या वर्ल्डकपसाठी आयसीसीचे ‘बॅकअप’ तयार

2021ची टी-20 विश्वकरंडक स्पर्धा भारतात, तर 2022 ची ऑॅस्ट्रेलियात होणार
भारतात होणार्‍या वर्ल्डकपसाठी आयसीसीचे ‘बॅकअप’ तयार

नवी दिल्ली - New Delhi

पुढील वर्षी टी-20 विश्वकरंडक स्पर्धेचे आयोजन करण्यास भारत असमर्थ ठरला, तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) श्रीलंका आणि संयुक्त अरब अमिराती (यूएई) हे देश पर्यायी स्थळ म्हणून ठेवले आहेत. या स्पर्धेला अजून एक वर्ष बाकी आहे.

यावर्षी ऑॅस्ट्रेलियामध्ये होणारी टी-20 विश्वकरंडक स्पर्धा कोरोना विषाणूच्या साथीमुळे एका वर्षासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. कोरोनामुळे श्रीलंका आणि यूएईला पुरुषांच्या टी-20 विश्वकरंडकासाठी ‘बॅकअप वेन्यू’ म्हणून ठेवण्यात आले आहे.

2023 ची विश्वकरंडक स्पर्धा भारतात होत असल्याने 2021ची टी-20 विश्वकरंडक स्पर्धा भारतात, तर 2022 ची ऑॅस्ट्रेलियात होणार असल्याचे आयसीसीने मागील आठवड्यात स्पष्ट केले होते.

कोणत्याही जागतिक स्पर्धेत बॅकअप कार्यक्रमासाठी एक मानक प्रोटोकॉल असतो. या अहवालानुसार, प्रत्येक आयसीसी स्पर्धेचा बॅकअप वेन्यू मानक प्रोटोकॉलनुसार निश्चित केला गेला असतो. परंतु यावेळी कोरोनाच्या दृष्टीने त्याचे महत्त्व जास्त आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com