Hockey World Cup : भारताची विजयी सलामी, स्पेनचा पहिल्याच सामन्यात धुव्वा

Hockey World Cup : भारताची विजयी सलामी, स्पेनचा पहिल्याच सामन्यात धुव्वा

दिल्ली | Delhi

ओडिशा येथे शुक्रवारी (13 जानेवारी) हॉकी विश्वचषकाला प्रारंभ झाला. यजमान भारतीय हॉकी संघाने स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी आपल्या मोहिमेला सुरुवात केली. स्पेनविरुद्धच्या आपल्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाने २-० असा विजय मिळवत विजयी प्रारंभ केला.

सामन्याच्या पहिल्या हाफपासूनच सामन्यावर पकड निर्माण केली होती. भारताकडून अमित रोहिदास आणि हार्दिक सिंग यांनी स्पेनचा गोलपोस्ट भेदला. पहिल्या क्वार्टरपासून चेंडूवर भारतीय हॉकी संघाने सॉफ्ट पासिंगद्वारे ताबा मिळवला होता. त्यांनी गोल करण्याच्या काही संधी देखील निर्माण केल्या. मात्र त्यांना गोल करण्यात यश आले नाही.

दरम्यान पहिल्या क्वार्टरच्या १२ व्या मिनिटाला भारताने आपल्या गोलचे खाते उघडले. भारताला पेनाल्टी कॉर्नर मिळाला होता. कर्णधार हरमनप्रीत सिंगने अमित रोहिदासला एक उत्कृष्ठ पास दिला. यावर अमित रोहिदासने भारताचा वर्ल्डकपमधील २०० वा गोल करत भारताला १ - ० अशी आघाडी मिळवून दिली.

यानंतर दुसऱ्या क्वार्टरमध्ये देखील भारताने आपले वर्चस्व कायम राखले. दुसरा क्वार्टर संपण्यास अवघी काही मिनिटे शिल्लक असताना हार्दिक सिंगने ड्रिबलिंगच्या सहाय्याने जबरदस्त गोल नोंदवला. भारताने स्पेनचा दुसऱ्यांदा बचाव भेदत २ - ० अशी आघाडी घेतली.

तिसऱ्या क्वार्टरमध्ये देखील भारताला गोल करण्याची नामी संधी मिळाली होती. भारताला पेनाल्टी शूटआऊट मिळाला होता. मात्र कर्णधार हरमनप्रीत सिंगला स्पेनचा गोलपोस्ट भेदता आला नाही. स्पेनच्या गोलकिपरने कर्णधाराचा फटका उत्कृष्टरित्या आडवला. चेंडू लाईनला टच होत होता मात्र रेफ्रीने गोल बहाल केला नाही.

१९७५ मध्ये अजितपाल सिंग यांच्या नेतृत्वाखाली भारताने एकमेव वर्ल्ड कप जिंकला होता. १९७१ मध्ये झालेल्या पहिल्या वर्ल्ड कप स्पर्धेत कांस्य आणि १९७३ मध्ये रौप्यपदक जिंकले होते. भुवनेश्वर येथे सुरू झालेल्या या वर्ल्ड कप स्पर्धेचा हा सामना पाहण्यासाठी प्रेक्षकांनी स्टेडियम खचाखच भरले होते आणि भारतीय संघासाठी त्यांनी तेराव्या खेळाडूची भूमिका सक्षमपणे पार पाडली.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com