IPL 2022 च्या फायनलमध्ये पाऊस पडला तर कोणता संघ विजयी होणार? कसा घेणार निर्णय?
मुंबई | Mumbai
यंदाच्या हंगामात आज गुजरात टायटन्सचा संघ राजस्थान रॉयल्सशी विजेतेपदासाठी भिडणार आहे. गुजरात टायटन्सने आपल्या पहिल्याच हंगामात फायनलपर्यंत मजल मारली आहे.
राजस्थानने २००८च्या विजेतेपदानंतर १४ वर्षांनी फायनल गाठली आहे, पण त्यांचीही यंदाची कामगिरी अतिशय उत्तम आहे. त्यामुळे यंदा कोणता संघ बाजी मारणार याकडे सर्वच चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे. अशातच आता सर्वांच्या मनात प्रश्न आहे तो म्हणजे, आजच्या फायनल सामन्यात जर पावसाने अडथळा केला तर कोणता संघ विजयी होणार?
आयपीएलच्या फायनल सामन्यात पावसासंदर्भात अनेक नियम आहेत. या सामन्यासाठी राखीव दिवस ठेवला गेला आहे. मात्र राखीव दिवसापर्यंत पोहोचण्यासाठी देखील काही नियम आहेत.
जर पावसामुळे सामना सुरु होण्यास उशीर झाला तर ओव्हर्समध्ये कपात न करता रात्री ९.२० वाजेपर्यंत सामना सुरु करावा. जर पाऊस सुरु असेल तर ५-५ ओव्हरचा सामना खेळवला जाऊ शकतो.
जर सामना रात्री १२.५० पर्यंत सुरु नाही झाला तर अशा परिस्थितीत सुपर ओव्हर खेळवण्यात येईल. यामध्ये दोन्ही टीम्सना एक-एक ओव्हर खेळवण्यास दिली जाईल. मात्र जर पाऊस थांबला नसेल तर सुपर ओव्हर खेळवणं संभव नाही. अशावेळी राखीव दिवसाचा उपयोग केला जाईल.
दरम्यान राखीव दिवशीही पाऊस असेल तर सर्व नियमांचं पालन केलं जाईल. अखेरीस पॉईंट्स टेबलच्या क्रमवारीत प्रथम असणाऱ्या संघाला विजयी घोषित केलं जाईल.